मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vijaya Babar : 'कंटाळा आलाय'; असं का म्हणाली विजया बाबर?, पाहा POST

Vijaya Babar : 'कंटाळा आलाय'; असं का म्हणाली विजया बाबर?, पाहा POST

vijaya babar

vijaya babar

विजया बाबरनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं घातलेला टी-शर्ट सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 1 ऑगस्ट : कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेनं अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं. यातील कलाकारांनाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. या मालिकेतली चंदा म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) ही देखील नेहमीच चर्चेत असते. विजयानं साकारलेल्या चंदा भूमिकेमुळे तिची लोप्रियता आणखीन वाढली. स्वामींच्या सेवेत लीन झालेली चंदा तिच्या भक्तीमुळे आणि निरागसतेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली. अशातच चंदा म्हणजे अभिनेत्री विजया बाबर एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. विजया बाबरनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं घातलेला टी-शर्ट सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. तिच्या या टी-शर्टवर लिहिलंय की, 'कंटाळा आलाय'. हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'कधी कधी येतो घरच्या कामाच कंटाळा'. तिचं हे भन्नाट कॅप्शन आणि कंटाळा आलाय टी-शर्ट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. हेही वाचा -  Vaibhav Tatwawadi : वैभवनं आगामी सिनेमातील एक झलक केली शेअर , VIDEO पोस्ट करत म्हणाला.... विजयाच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'चंदा राणी, तुमची पोस्ट पाहताना कधीच कंटाळा येत नाही, परफेक्ट टी-शर्ट फॉर यू, प्रवास कमी करत जा मग', अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते करताना दिसत आहेत. तिच्या फोटोंना लाईक्सचाही वर्षाव होत आहे.
View this post on Instagram

A post shared by Vijaya Babar (@vijaya_babar)

दरम्यान, विजया बाबरची 'जय जय स्वामी समर्थ' ही पहिलीच मालिका असून तिनं यापहिले नाटकांमध्ये काम केलं आहे. विजया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून ती अनेक निरनिराळ्या पोस्ट शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.
First published:

Tags: Colors marathi, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या