Home /News /entertainment /

जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा ; नवीन वर्षात या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ

जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा ; नवीन वर्षात या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ

बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात देखील जोरात लगीनघाई सुरू आहे. कोण साखरपुडा तर कोण लग्न करत आहेत. आता जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील अभिनेत्रीचा (pooja raibagi ) नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

  मुंबई, 1 जानेवरी- बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात देखील जोरात लगीनघाई सुरू आहे. कोण साखरपुडा तर कोण लग्न करत आहेत. आता जय जय स्वामी समर्थ ( jay jay swami samarth)   या मालिकेतील अभिनेत्रीचा (pooja raibagi ) नुकताच साखरपुडा पार पडला आहे. मालिकेत कालींदी हे नकारात्मक भूमिका साकारणार अभिनेत्री पूजा रायबागी हिने ( pooja raibagi engagement)नुकताच साखरपुडा केला आहे. सोशल मीडिावर काही फोटो शेअर करत तिनं ही माहिती दिली आहे. पूजा रायबागी हिने 28 डिसेंबर 2021 रोजी प्रसाद डबके सोबत साखरपुडा केला आहे. प्रसाद डबके हा देखील अभिनेता आहे. स्टार प्रवाहवरील नुकत्याच येऊन गेलेल्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेत तो दिसला होता. गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका त्याने या मालिकेत साकारली होती. फक्त मराठीवरील सिंधू या मालिकेत देखील त्याने गंगाधर अष्टपुत्रेची भूमिका साकारली होती. आता नवीन वर्षात ही जोडी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
  पूजा रायबागी ही मुंबईची आहे. ती मुंबईतच लहानाची मोठी झाली. अभिनयाचे धडे गिरवत असताना पूजाला तांडव चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. डॅशिंग पोलीस अधिकारी कीर्ती पाटीलची भूमिका तिने या चित्रपटात साकरली होती. या भूमिकेसाठी पूजाला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले होते. जुन्नर मधील विनायक खोत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना ती तिथेच गावी राहिली होती. वाचा-VIDEO: स्वप्नील जोशीने चाहत्यांना दिली न्यू ईयर ट्रीट! ‘अश्वत्थ’चा टीजर रिलीज यदा कदाचित, खळी, ललित 205, झुंड, फायरब्रँड, असंही होतं कधी कधी, संगीत मत्स्यगंधा, कानांची घडी तोंडावर बोट या नाटकातून आणि मालिकेतून तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेत ती जरी नकारात्मक भूमिका साकारत असली तरी प्रेक्षकांकडून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या