मुंबई, 22 नोव्हेंबर: कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच या मालिकेतील अभिनेता अनुज ठाकरे विवाहबद्ध झाला (anuj thakare weds ashwini gorale) आहे. रविवारी 21 नोव्हेंबर 2021 रोजी नागपूर येथे अनुज आणि अश्विनी गोरले यांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. अश्विनीने तिच्या इनस्टा स्टोरीला काही फोटो ठेवले आहेत. अनुजची पत्नी अश्विनी ही देखील अभिनेत्री आहे.सोशल मीडियावर देखील या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर, जान्हवी किल्लेकर, पूजा रायबागी तसेच चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यांनी अनुजच्या लग्नाला हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या दिवशी विजया बाबर हिने अनुजच्या लग्नाला नागपूरला जात असल्याची पोस्ट शेअर केली होती.
वाचा : अजून कोरोना संपलेला नाही!' पॉझिटिव्ह आल्यानंतर या अभिनेत्यानं केलं Tweet
अनुज ठाकरे हा मूळचा विदर्भातील चांदुर रेल्वे या गावचा आहे. शाळेत असल्यापासूनच तो बालनाट्यातून सहभाग घ्यायचा. नाट्यशास्त्रातुन त्याने पदवीचे शिक्षण घेतले. नाट्यशास्त्रात संगीत विषय शिकवला जातो त्यामुळे पुढे बाजीराव मस्तानी, नवा गडी नवं राज्य, आधी बसू मग बोलू या नाटकासाठी म्युजिक ऑपरेटिंगच काम त्याने केलं आहे. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धां मध्ये सहभाग घेतला.
View this post on Instagram
अनुज ठाकरेला मुंबईत आल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर नंबर 1 या मालिकेत पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन या लोकप्रिय मालिकेतून त्याने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यानंतर क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या हिंदि मालिकेत छोट्या छोट्या भूमिका साकारल्या.
वाचा : VIDEO: 'देवमाणूस 2' च्या प्रमोशनासाठी चक्क रणवीर सिंह उतरला मैदानात तेही सूर्यवंशी स्टाईल...
आता अनुज ठाकरेला जय जय स्वामी समर्थ या मालिकेत “सुमुख” हे अफलातून पात्र साकारण्याची नामी संधी त्याला मिळाली. दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसवून स्वतःची फजिती करून घेणारा सुमुख हा विनोदी खलनायक प्रेक्षकांना देखील खूपच आवडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.