मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Javed Jaffrey Birthday : या कारणामुळे वडिलांचा द्वेष करायचा जावेद जाफरी; कधी नावही नाही लावलं

Javed Jaffrey Birthday : या कारणामुळे वडिलांचा द्वेष करायचा जावेद जाफरी; कधी नावही नाही लावलं

जावेद जाफरी बर्थ डे

जावेद जाफरी बर्थ डे

अभिनेता, डान्सर, अँकर असा मल्टिटेलेंडेड अभिनेता जावेद जाफरीच्या वाढदिवशी त्याच्या काही पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 04 डिसेंबर : बॉलिवूडचा मल्टीटॅलेंटेड अभिनेता ओळखला जाणार अभिनेता जावेद जाफरी आज त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात काम करत जावेदनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरचं जावेद उत्तम डान्सर, सिंगर, व्हिडीओ जॉकी आणि जाहिरात निर्माता देखील आहे. 1985साली त्यांनं जंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात त्यानं निगेटिव्ह भूमिका केला. आज त्याच्या वाढदिवशी त्याच्या काही पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी जाणून घेऊया.

जावेद जाफरीचा जन्म 4 डिसेंबर 1963 साली मुंबईत झाला. जावेदचं खरं नाव सईद जावेद अहमद जाफरी असं आहे. म्हणजेच अभिनेते आणि कॉमेडियन जगदीप जाफरी यांचा तो मुलगा. पण जावेदनं कधीच आपल्या वडिलांचं नाव लावलं नाही. 'शोले', 'अंदाज अपना अपना' सारखे अनेक हिट सिनेमे जावेदनं केले. अनेक कार्टून्सनाही त्यानं आवाज दिला.

हेही वाचा -  लग्नाआधीच होती प्रेग्नंट; घटस्फोटानंतर एकटी करतेय मुलाचा सांभाळ, कोंकणा सेनचं Net Worth माहितीये का?

लहान असताना जावेद आणि त्याच्या वडिलांचं कधीच पटलं नाही. दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते. जावेदचे वडील जगदीप यांना जुगार आणि दारूचं व्यसन होतं. दारून त्यांनी पैसे उडवले. त्यांच्या या सवयीचा जावेदला प्रचंड राग यायचा. त्यामुळे तो कधीच वडिलांशी नीट बोलू शकला नाही. पण जस जस तो मोठा झाला त्याचा वडिलांवरचा राग कमी झाला. त्यानंतर तो वडिलांचा सन्मान करू लागला. पण स्वत:च्या फायद्यासाठी त्यानं कधीच सिनेसृष्टीत वडिलांचं नाव लावलं नाही.

हेही वाचा -  हँडसम दिसण्याचा प्रयत्न फसला; CID फेम दया आता सहन करतोय भयंकर त्रास आणि वेदना

जावेद जाफरी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच मात्र त्यानं राजकारणारतही नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला होता. 2014मध्ये तो लोकसभा निवडणूकीसाठी आम आमदी पक्षाकडून उभा राहिला होता. भाजपचे नेते राजनाथ सिंह यांच्याकडून त्याचा पराभव झाला.

अभिनेत्याची पत्नी हबीबा जाफरी आणि तीन मुलं असा त्याचा परिवार आहे. मुलगी अलविया आणि दोन मुलगे मीजान आणि अब्बास यांच्याबरोबर त्याचा सुखाचा संसार सुरू आहे. मुलगा मीजाननं 2019मध्ये मलाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तर दोन मुलं लाइमलाइटपासून फार दूर राहतात.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News