Home /News /entertainment /

'विचार चांगला आहे, पण...'; इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा उभारण्यावरुन जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान

'विचार चांगला आहे, पण...'; इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा उभारण्यावरुन जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान

Javed Akhtar

Javed Akhtar

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यावरुन जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 जानेवारी: आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकवेळा अडचणीत आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त ट्विटकरत नवा वाद निर्माण केला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यावरुन जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन केली जात असताना दुसरीकडे तिथे आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात ( netaji subhash chandra bose grand statue ) येणार आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. मोदी यांच्या या घोषणेनंतर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रीय उमटू लागल्या. दरम्यान, जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. पण पुतळ्याची निवड बरोबर नाही नेताजींच्या पुतळ्याची कल्पना ठीक आहे. पण पुतळ्याची निवड बरोबर नाही. दिवसभर ट्रॅफिक त्याभोवती फिरत असेल आणि पुतळा सलाम करतानाच्या अवस्थेत उभा असेल. त्यामुळे असा पुतळा हे त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा खालच्या स्तरावर आहे. ते नेताजींच्या पुतळ्याच्या प्रतिष्ठेनुसार नाही आहे. त्यामुळे पुतळा एकतर बसलेल्या अवस्थेत किंवा घोषणा देत असल्याप्रमाणे हवेत हात फिरवतानाच्या अवस्थेत असावा. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जावेद सर, कृपया एकदा हेही सांगा की दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे ही कल्पना चांगली आहे पण लाऊडस्पीकर वापरणे योग्य नाही. नमाज हा एक खाजगी क्षण आहे आणि तो एकतर मशिदीच्या आसपासच्या समुदायाला कोणताही आवाज किंवा त्रास न देता घरामध्ये आयोजित केला पाहिजे. तर, दुसर्‍या एका युजरने काँग्रेसला नेताजींचा इतका त्रास का आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Pm modi

    पुढील बातम्या