Home /News /entertainment /

‘निर्दोष लोकांना तुरुंगात डांबा’; मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणावरून जावेद अख्तर संतापले

‘निर्दोष लोकांना तुरुंगात डांबा’; मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणावरून जावेद अख्तर संतापले

गाझियाबाद व्हायरल व्हिडीओ प्रकरणी जावेद अख्तर संतापले; ते म्हणाले खोटे पुरावे तयार करुन निर्दोष लोकांना तुरुंगात डांबा, अन्...

    मुंबई 17 जून: उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करण्यात आली. (Ghaziabad viral video) या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं हा वाद आता चिघळू लागला आहे. दरम्यान या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं ट्विट करत संताप व्यक्त केला होता. मात्र हे ट्विट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. व्हिडीओची सत्यता न पडताळता व्हिडीओ व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी आता जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. ‘निष्पाप लोकांना तुरुंगात डांबा’ असा टोला त्यांनी लगावला आहे. “मी अशा लोकांचा विचार करतोय ज्यांनी निर्दोष लोकांना जाणूनबुजून अटक केली, त्यांना मारहाण केली, तुरुंगात डांबलं, खोटे पुरावे व साक्षीदार सादर केले आणि आता स्वत:च्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत मस्त वेळ घालवत आहेत. मुलांसोबत खेळतायेत. चांगलं जेवण करतायेत. ही लोक आपल्या निरागस मुलांच्या नजरेना नजर देऊन कसे काय जगू शकतात कोण जाणे.” अशा आशयाचं ट्विट करुन जावेद अख्तर यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल? टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ OMG! कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला; सिक्रेट बॉयफ्रेंडबरोबर होणार शिफ्ट? दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वकील अमित आचार्य यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी याआधी गाझियाबाद पोलिसांनी 9 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये काँग्रेसचे नेते, पत्रकार आणि ट्विटरच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Shocking viral video, Swara bhaskar

    पुढील बातम्या