• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘महाराष्ट्राकडून काहीतरी शिका’; जावेद अख्तर यांचा केंद्राला टोला

‘महाराष्ट्राकडून काहीतरी शिका’; जावेद अख्तर यांचा केंद्राला टोला

महाराष्ट्राकडून इतरांनीही शिकायला हवं असा प्रत्यक्ष टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे. त्यांची ही कॉमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 • Share this:
  मुंबई 9 मे: राज्यातील कोरोना रुग्णांची (coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. औषधं, लसी, रुग्णालयातील बेड यांची कमतरता भासु लागली आहे. मात्र याही परिस्थितीत दिवस-रात्र एक करुन महाराष्ट्र सरकार आणि BMC लोकांची मदत करतेय. अन् यासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी त्यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. महाराष्ट्राकडून इतरांनीही शिकायला हवं असा प्रत्यक्ष टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे. त्यांची ही कॉमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातला आहे. तरी देखील सरकार आणि BMC नं जबरदस्त क्षमतेनं काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं.” अशा आशयाचं ट्विट करत जावेद अख्तर यांनी कौतुक केलं. यापूर्वी अनेकदा त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका केली आहे. कोरोना काळातही ते मोदी सरकारला वारंवार धारेवर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप शासित प्रदेशांवर भाष्य केलं असं म्हटलं जात आहे. त्यांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यापूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील महाराष्ट्र सरकारची स्तुती केली होती. ट्विटरनंतर आता इन्स्टानेही घेतला कंगनाशी पंगा; मोठी कारवाई केल्यानं भडकली अभिनेत्री अत्यंत अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल 2 हजार 208 खाटा (बेड) आहेत. यामध्ये 868 ऑक्सीजन बेड असून 120 अतिदक्षता रुग्णशय्या (ICU Beds) यांचा समावेश आहे. याचबरोबर 67 रुग्णशय्यांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट' देखील आहे. या व्यतिरिक्त ज्या कोविड बाधित रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज असते, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठी 12 रुग्णशैय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दिवसाचे 24 तास व आठवड्याचे सातही दिवस यानुसार साधारणपणे 378 डॉक्टर्स, 399 परिचारिका व 513 वैद्यकीय कर्मचारी (वॉर्डबॉय) कार्यरत आहेत. याचबरोबर रुग्णालयाच्या इतर व्यवस्थेसाठी 200 कर्मचारी कार्यरत असून 152 सुरक्षारक्षक देखील सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत. तसेच या रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देखील सदोदित कार्यतत्पर आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: