Big Boss 12 : जसलीन जलोटांना 'या' रोमँटिक नावानं मारते हाक!

Big Boss 12 : जसलीन जलोटांना 'या' रोमँटिक नावानं मारते हाक!

अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या जोडीचं पॅचअप करण्याचा प्रयत्न बिग बॉसतर्फे करण्यात आलाय.

  • Share this:

मुंबई, 6 आॅक्टोबर : बिग बाॅसमध्ये काय काय आश्चर्याचे धक्के बसतील ते काही सांगता येत नाही. श्रीसंत, नेहा आणि रोमिल यांना जेलमध्ये पाठवून बिग बाॅसनं चकित केलं होतं. आता बिग बाॅसनं जसलीन आणि अनुप जलोटांसाठी कँडल लाईट डिनरचं आयोजन केलं.

अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या जोडीचं पॅचअप करण्याचा प्रयत्न बिग बॉसतर्फे करण्यात आलाय. त्यासाठी या दोघांसाठी एका खास कँडललाईट डिनरचं घरात आयोजन करण्यात आलं होतं. या डिनर दरम्यान अनुप आणि जसलीन यांच्यातील वाद चर्चेने मिटलाय. आणि अनुपजींनी हातात गुलाबाचं फूल घेऊन जसलीनला आय लव्ह यू म्हटल्याने हे लव्ह बर्ड्स पुन्हा एकत्र आलेत.

यावेळी बऱ्याच गोष्टी समोर आल्या. बिग बाॅसनं यावेळी घरातल्या स्त्रीवर्गाला जसलीनला तयार करायला सांगितलं होतं.जसलीन बाहेर आली ती भारतीय वेशभूषेत. अनुप जलोटांनी तर म्हटलं, जणू मी स्वर्गात आहे. तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी चौदवी का चांद गाणं गायलं.

यावेळी काही गुपितंही समोर आली. जसलीन जलोटांना प्रेमानं प्यारे म्हणते.गुडघ्यावर बसून त्यांनी जसलीनला य लव्ह यु म्हटलं.

बिग बॉस १२ च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये जसलीन मथारूचे अनुप जलोटांसाठी असलेल्या प्रेमाची अग्नीपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ती सपशेल नापास झाली. बिग बॉसने दिलेल्या एका टास्कमध्ये अनुप यांना नॉमिनेशनमधून वाचवण्यासाठी जसलीनला स्वतःचे केस, मेकअप आणि कपडे यांचा बळी द्यावा लागणार होता.

जसलीनने यासाठी स्पष्ट नकार दिला. जसलीनचे कपडे आणि मेकअपसाठी असलेले प्रेम पाहून जलोटांना अतीव दुःख झालं. तिच्या या प्रकारातूनच त्यांनी जसलीनसोबतचे नाते संपण्याचा निर्णय घेतला.

चार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी

First published: October 6, 2018, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading