Home /News /entertainment /

जपानमध्ये 4 सेलिब्रिटींनी केली आत्महत्या; Covid-19 काळातच का संपवलं आयुष्य?

जपानमध्ये 4 सेलिब्रिटींनी केली आत्महत्या; Covid-19 काळातच का संपवलं आयुष्य?

कोरोना काळात अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. एकीकडे भारतात सुशांत सिंह राजपूत आणि इतर सेलिब्रिटींच्या आत्महत्याच्या घटना समोर येत असतानाच जपानमध्येही अनेक कलाकारांनीही आत्महत्या केल्या आहेत

    टोकिओ, 29 सप्टेंबर : जगभरात कोरोनाच्या या संकटामुळं अनेकजण चिंतेत आहेत. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून रुग्ण संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर या काळात मानसिक ताणतणावदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच जपानमध्ये  Yuko Takeuchi या अभिनेत्रीने आत्महत्या केली. त्यानंतर जपान सरकारने पुढे येत नागरिकांना आपल्या मानसिक आरोग्याची समस्या मांडण्याचं आवाहन केलं आहे. अनेकजण नैराश्यात असतात. मात्र  ते आपली समस्या आपल्या प्रियजनांना सांगत नाहीत.  त्यामुळेच शेवटी ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. Miss Sherlock या प्रसिद्ध  शोमधील कलाकार  Yuko Takeuchi हिनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करणारी ती जपानमधील चौथी सेलिब्रिटी आहे. त्यामुळे कलाकारांमध्ये तणाव आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे  Yuko Takeuchi हिने नुकतंच जानेवारी महिन्यात आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता.  सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला  Ashina Sei आणि जुलै महिन्यात Miura Harumi तर मे महिन्यात TV star Kimura Hana यांनी आत्महत्या केल्या आहेत. भारतात देखील जून महिन्यात बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात राजकारण रंगलं होतं. पण जपानमध्ये सरकारने यासंदर्भात उपाययोजना आणि जनतेला आधार देण्याचं काम सुरू केलं आहे. दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेमध्ये कोरोना काळात नैराश्यग्रस्त होण्याचं नागरिकांचं प्रमाण वाढलं आहे. जपानमध्ये ऑगस्ट महिन्यात 1900 आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. भारतात देखील यामध्ये वाढ झाली असून बेंगळुरूमधील  सुसाईड प्रिव्हेन्शन इंडिया फाऊंडेशन (Suicide Prevention India Foundation) च्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. कोलकाता आणि हिमाचल प्रदेशमध्येदेखील आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. सेलिब्रिटींनी केलेल्या कृत्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींवर होत असतो. ते समाजाचे तरुणाईचे आदर्श असतात. त्यामुळे या प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांनी आत्महत्या केल्यानंतर समाजात चुकीचा संदेश जातो. आपलं मन मोकळं करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्याचा विचार करायला हवा. तसं सेलिब्रिटींनी केल्याचं उदाहरण लोकांसमोर आलं तर ते हिताचं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Suicide, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या