Home /News /entertainment /

आईच्या आठवणीने जान्हवी कपूर व्याकूळ; सोशल मीडियावर शेअर केला आई-वडिलांचा फोटो

आईच्या आठवणीने जान्हवी कपूर व्याकूळ; सोशल मीडियावर शेअर केला आई-वडिलांचा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvai Kapoor)ने आपल्या आई -वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्रीदेवी (Shridevi) यांच्या अनेक आठवणी ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

  मुंबई, 27 ऑक्टोबर: अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) ने सोशल मीडियावर तिचे आई-वडील श्रीदेवी ( sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor ) यांच्या काही प्रेमळ आठवणी पोस्ट केल्या. "या फोटोकडे पाहून त्यांच्यातलं निखळ प्रेम जाणवतं. आईची आठवण येते असं ती म्हणते." असं जान्हवीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्या फोटोमध्ये ते दोघे समुद्रकिनारी उभे राहून पोज देत आहेत त्यांच्या मागे वाळू आणि समुद्राचं पाणीही दिसतंय. दोघांनी अतिशय प्रेमाने एकमेकाला मिठीत घेतलंय आणि आनंदाने हसताना दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री 2018 मध्ये पुतण्या मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबईमध्ये गेल्या असताना हॉटेलमधील बाथ डबमध्ये बुडून गूढ पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या अकाली निधनामुळे अजूनही कोट्यावधी लोक तिची आठवण काढतात. जान्हवी कपूर बरेचदा आपल्या आईबद्दल पोस्ट करत असते. जान्हवीने ह्या वर्षी 'मदर्स डे' ला आणखी एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती ज्यात ती श्रीदेवीच्या कुशीत अगदी एखाद्या बाहुलीसारखी वाटत होती. याचसोबत या अभिनेत्रीने फेब्रुवारीमध्ये तिच्या आईच्या पुण्यतिथीला आपल्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने, "मिस यू एव्हरी डे" असं लिहिलं होतं. त्या फोटोमध्ये आई आणि लहान जान्हवी प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत.
  View this post on Instagram

  ❤️

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

  जान्हवीने नुकतंच नेटफ्लिक्सच्या फिल्म 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या सिनेमामध्ये काम केलं होतं. शरण शर्मा दिग्दर्शित या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी हे देखील होते. जान्हवी सध्या तिच्या पुढील प्रोजेक्टच्या कामामध्ये गुंतली आहे. लवकरच ती 'रुही अफझाना' या चित्रपटात राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हार्दिक मेहता यांनी साकारलेल्या ह्या विनोदी हॉररपटामध्ये वरुण शर्मा, आमना शरीफ, पंकज त्रिपाठी, सीमा पहावा आणि रोनित रॉयदेखील दिसणार आहेत. 'दोस्ताना 2' मध्येही जान्हवीची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाचे हिरो कार्तिक आर्यन आणि लक्ष्य हे दोघे आहेत. करण जोहरच्या तख्त चित्रपटात सुद्धा जान्हवी झळकणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress, Janhavi kapoor

  पुढील बातम्या