Home /News /entertainment /

समुद्रकिनारी जाऊन जान्हवी कपूरने पुन्हा अनुभवलं बालपण; म्हणाली...

समुद्रकिनारी जाऊन जान्हवी कपूरने पुन्हा अनुभवलं बालपण; म्हणाली...

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच अनेक बड्या कलाकारांसोबत सिनेमामध्ये झळकणार आहे. तख्त, दोस्ताना 2, रुही अफजाना असे मोठे प्रोजेक्ट तिच्या हातात आहेत.

  मुंबई, 12 डिसेंबर: आपल्या प्रत्येकामध्येच एक लहान मूल दडलेलं असतं. आपण कितीही मोठे झालो तरी, आपल्या मनातलं ते लहान मूल कधीही मोठं होत नाही. अभिनेत्री जान्हवी कपूरचही (Janhvi Kapoor) अगदी तसंच आहे. शूटिंग आणि व्यस्त वेळापत्रकामुळे बरेचदा तिला मनासारखं वागता येत नाही. पण जान्हवी कधीतरी वेळ काढून तिच्यात जपलेल्या लहान मुलाला भेटते आणि पुन्हा कामासाठी चार्ज होऊन येते. जान्हवी कपूर नुकतीच समुद्रकिनारी भटकायला गेली होती. तिथे सनसेटचा आनंद घेतला. समुद्रावरचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत. या फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे, ‘समुद्र किनारा म्हणजे मजा करण्याचं ठिकाण.’
  श्रीदेवीची ही मुलगी सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिचे फोटो, व्हिडीओ याबद्दल ती चाहत्यांना सोशल मीडियावरुन माहिती देत असते. तिने नुकताच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या ती भारतीय पारंपरिक नृत्य सादर करताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
  कामाच्या बाबतीत बोलायचं तर जान्हवी कपूर दोस्ताना 2 या सिनेमामध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. तसंच करण जोहरचा बिग बजेट सिनेमा ‘तख्त’ (Takht) याचाही ती एक हिस्सा असेल. या सिनेमामध्ये तिच्यासोबत करीना कपूर (Kareena Kapoor), विकी कौशल (Vicky Kaushal), अनिल कपूरही (Anil Kapoor) दिसणार आहेत. तसंच राजकुमार रावसोबतची ती एक सिनेमा करत आहे. या सिनेमाचं नाव रुही अफजाना Roohi Afzana असं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress, Janhavi kapoor

  पुढील बातम्या