मुंबई, 11 जानेवारी: चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी नुकतंच आपल्या आगामी चित्रपटाचं दिल्लीतील चित्रीकरण पूर्ण केलं आहे. 'अंतरंगी रे' हा त्यांचा आगामी चित्रपट असून यामध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिल्लीतील चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेच चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी 'गुड लक जेरी' नावाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका बॉलिवूडची कारगील गर्ल जान्हवी कपूर साकारणार आहे. याची माहिती आनंद एल राय यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. पण तिच्या या फर्स्ट लुकच्या चर्चेऐवजी जान्हवीच्या स्टेटस मेसेजचीच चर्चा आहे.
फर्स्ट लुक शेअर करते वेळी त्यांनी आपला आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' चित्रपटाचं पोस्टरही पोस्ट केलं आहे. शिवाय पंजाबमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाल्याचही त्यांनी सांगितलं आहे. 'गुड लक जेरी' या चित्रपटात जान्हवी कपूरसोबतच दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या वेळापत्रकाचे चित्रीकरण मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता हे करणार असून असून याची कथा पंकज मट्टा यांनी लिहिली आहे.
चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनामुळे शूटिंगला ब्रेक मिळाला. जान्हवी कपूरलाच शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याविषयी तिने पोस्टही केली आणि त्याचीच चर्चा अधिक झाली.

राय हे राझना आणि तनु वेड्स मनु सीरीज अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी जान्हवी कपूर मुख्य भुमिका असलेल्या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. जान्हवीचा रॉय यांच्यासोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी जान्हवी, करण जोहर यांच्या गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तिनं एक इंडियन एअर फोर्समधील महिला पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयावरून तिच्यावर बरीच टीका झाली, तर काहींनी तिच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं होतं.
“गुड लक जेरी” हा चित्रपट 'कोलामाऊ कोकीला' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नयनताराची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.