मुंबई, 14 जून : अभिनेत्री जान्हवी कपूर आजकाल तिचा आगामी सिनेमा ‘कारगिल गर्ल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमामध्ये ती भारतीय वायूसेना अधिकारी गुंजन सक्सेनाची भूमिका साकरत आहे. याशिवाय आता जान्हवीचा आणखी एक सिनेमा ‘रूह अफ्जा’चं शूटिंग सुरू झालं आहे. पण या सिनेमाचं नाव मात्र आता बदलण्यात आलं आहे. आता या सिनेमाचं नाव ‘रूही अफ्जा’ करण्यात आलं असून याचा फोटो जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.
जान्हवीनं तिचा आगामी सिनेमा 'रूही अफ्जा'च्या क्लॅप बोर्डचा फोटो पोस्ट करत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर केली. तिनं लिहिलं, 'करने आ रहे हैं अटेंशन पर कब्जा, आज से शुरू होती है रूही अफ्जा.' या सिनेमाचं नाव अगोदर ‘रूह अफ्जा’ असं होतं मात्र या नावावरून वाद निर्माण झाल्यानंतर ते बदलण्यात आलं. आता ते 'रूही अफ्जा' करण्यात आलं आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित ‘मुंबई सागा’मध्ये दिसणार ‘हे’ स्टार कलाकार
‘रूही अफ्जा’ या सिनेमामध्ये जान्हवी कपूर डबल रोल करताना दिसणर आहे. यामध्ये ती रूही आणि अफसाना अशा दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये जान्हवी राज कुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय फुकरे फेम वरुण शर्माची सुद्धा या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हार्दिक मेहता करत असून हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे.
जसलीन नंतर आता 'या' अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा?