जेव्हा जान्हवी तिच्या ड्रेसवरून प्राइज टॅग काढायला विसरते!

जेव्हा जान्हवी तिच्या ड्रेसवरून प्राइज टॅग काढायला विसरते!

फोटोग्राफर विरल भयानीने जान्हवीचा एक व्हिडीओ शेअर केला. यात तिने पिवळ्या रंगाचा सूट आणि प्लाझो सेट घातला होता.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टेबर-  बॉलिवूडच्या फॅशन सेन्सबद्दल तर साऱ्यांनाच माहीत आहे. अनेकदा अभिनेत्रींचे OOTD अर्थात Outfit Of The Day वर त्यांचे चाहते नजर ठेवून असतात. पण नुकतीच अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आउटफिटमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. जान्हवीने एक सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता. पण या ड्रेसवर असलेल्या किंमतीचा टॅग काढायला ती विसरली. नेमकी याच गोष्टीमुळे तिला ट्रोल करण्यात येत असून सोशल मीडियावर तिची थट्टा उडवण्यात येत आहे. अनेकांनी तर 'किंमतीचा टॅग नसेल तर विकत घेतलेला हा ड्रेस परत करू शकत नाही, त्यामुळे तिने टॅग काढला नाही.'

फोटोग्राफर विरल भयानीने जान्हवीचा एक व्हिडीओ शेअर केला. यात तिने पिवळ्या रंगाचा सूट आणि प्लाझो सेट घातला होता. व्हिडीओत जान्हवी तिच्या प्लाटे क्लासमधून बाहेर निघाली आणि गाडीकडे जाताना दिसते. जान्हवीला पाठीमागून पाहताना तिच्या आउटफिटकडे नजर जाते तेव्हा किंमतीचा टॅग दिसतो. जान्हवीच्या या व्हिडीओनंतर अनेकांचं असं म्हणणं आहे की, जान्हवीने फक्त यासाठी टॅग काढला नाही कारण मिंत्रा ते कपडे टॅगशिवाय परत घेणार नाही. पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

#jhanvikapoor snapped at her pilates class today #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

जान्हवी कपूरने नुकतेच 'दोस्ताना 2' सिनेमाच्या चित्रीकणाला सुरुवात केली. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम स्टारर दोस्ताना सिनेमाचा हा सीक्वल आहे. याशिवाय जान्हवी लवकरच 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' सिनेमातही दिसणार आहे.

साराचा श्रीलंकेच्या बीचवर Vacation; बिकिनी लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

वयाच्या 46व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा,11वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या