Home /News /entertainment /

Janhvi Kapoor Kiss: जान्हवी कपूरला एक्स-बॉयफ्रेंड अक्षत राजनने केला किस; व्हिडिओ व्हायरल

Janhvi Kapoor Kiss: जान्हवी कपूरला एक्स-बॉयफ्रेंड अक्षत राजनने केला किस; व्हिडिओ व्हायरल

या पार्टीचे तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो भरपूर व्हायरल होत आहेत. ही थीम पार्टी होती. यामध्ये जान्हवी कपूर मौज-मजा करताना हटके लूकमध्ये दिसली.

  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : जान्हवी कपूरने (janhvi kapoor) नुकताच तिचा एक्स-बॉयफ्रेंड अक्षत राजन आणि बहीण खुशी कपूरसोबत पार्टीत धमाल केली. या पार्टीचे तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो भरपूर व्हायरल होत आहेत. ही थीम पार्टी होती. यामध्ये जान्हवी कपूर मौज-मजा करताना हटके लूकमध्ये दिसली. फोटोमध्ये जान्हवी कपूरने (janhvi kapoor) स्टाईलिश ड्रेस घातला आहे, तर खुशी कपूरने काळा शर्ट आणि पँट घातली आहे.
  जान्हवी कपूर एक्स बॉयफ्रेंड अक्षतला मिठी मारताना दिसत आहे, तर अक्षय तिच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. यानंतर, खुशी कपूर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. जान्हवी आणि खुशी व्यतिरिक्त आणखी बरेच लोक या पार्टीत धमाल करताना दिसत आहेत. फुगे, कट आउट आणि बऱ्याच गोष्टींची पाठिमागे सजावट आहेत. जान्हवीने गुरुवारी तिच्या फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले. तिने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. जान्हवी कपूरने यापूर्वी अक्षत राजनला त्याच्या वाढदिवसाच्या अगदी रोमँटिक शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला शुभेच्छा देताना ती म्हणाली की, मी तुझ्यावर प्रेम करते. तिनं असंही लिहिलंय की, 'जगातील सर्वोत्तम माणसाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, मी तुझ्यावर प्रेम करते.'
  दरम्यान, जान्हवी कपूर शेवटी रुही चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आता ती लवकरच गुड लक जेरीमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती तख्त आणि दोस्ताना-2 मध्येही दिसणार आहे. दोस्ताना 2 चे शूटिंग अलिकडेच पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाचा - राज कुंद्रा 119 पोर्न फिल्म 8.84 कोटींना विकण्याच्या होते तयारीत; काय होता त्यांचा बिझनेस प्लॅन? जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तिचं नाव अनेक चित्रपटांशी जोडलं जात आहे, जरी तिने अद्याप याची अधिकृत माहिती दिलेली नाही. खुशी कपूर सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Janhavi kapoor

  पुढील बातम्या