बॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली

बॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली

बॉलीवूड अभिनेत्रीनं कोटींच्या घरात असलेली कार खरेदी केली असून आईची खास आठवणही जपली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. यावेळी ती कोणत्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या कारमुळे चर्चेत आहे. जानव्हीने ब्लॅक मर्सिडीज मेबॅक लक्झरी सिडानमधून फेरी मारली. या कारच्या किंमतीमुळे चर्चा होत असली तरी जान्हवीसाठी ही कार वेगळ्याच कारणासाठी खास आहे. या कारचा नंबर जानव्हीची आई श्रीदेवींच्या कारचा होता तोच आहे.

जानव्ही कपूरच्या ब्लॅक मर्सिडीज मेबॅकचा नंबर MH 02 FG 7666 असा आहे तर श्रीदेवींच्या पांढऱ्या मर्सिडीज बेन्झ एस क्लासचा नंबर MH 02 DZ 7666 असा आहे. जान्हवीने कार स्वत: खरेदी केली की तिला गिफ्ट करण्यात आली हे समजू शकलेलं नाही.

ब्लॅक मर्सिडीज मेबॅकचे एस 560 मॉडेल जान्हवीकडे आहे. या कारची एक्स शोरूम किंमत जवळपास 1.99 कोटी रुपये आहे. तसेच एस 650 ची एक्स शोरूम किंमत 2.73 कोटी रुपये आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे तो इंजिनचा. जान्हवीने घेतलेल्या कारचे इंजिन 4.0-litre V8 engine आहे तर S 650 मध्ये 6.0-litre V12 engine आहे.

मर्सिडीज कारचे भारतात प्रचंड वेड आहे. सेलिब्रिटीज पासून उद्योगपतींपर्यंत या कारची खरदी करतात. मंदीच्या काळात इतर कारची खरेदी घटली असताना मर्सिडीजच्या विक्रीत वाढ झाली. सणासुदीच्या काळात मर्सिडीजने मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये मिळून एकाच दिवशी 200 पेक्षा अधिक कार विकल्या. दसरा आणि नवरात्रीत या कारचे बुकींग करण्यात आलं होतं.

वाचा : जगप्रसिद्ध कंपनीने उपलब्ध केल्यात फक्त 200 बाइक, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

स्वस्तात कार विकताना कंपन्यांचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ?

Toyota Glanza चे स्वस्त मॉडेल लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या