मुंबई, 17 जानेवारी: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) श्रीदेवीची (sridevi) मुलगी आणि जान्हवी कपूरची (janhavi kapoor) छोटी बहीण खुशी कपूरने (Khushi kapoor) काही दिवसांपूर्वी तिचं इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंट सार्वजनिक केलं आहे. तेव्हापासून ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ (Video) इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये खुशी कपूर, राणी मुखर्जीच्या (Rani Mukharji) चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये खुशी तिच्या मैत्रिणीसोबत या संवादांवर जबरदस्त हावभाव देत आहे.
हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुशी कपूरची मैत्रीण खुशीला, "यू बिच" अशी शिवी देते. त्यावर खुशी म्हणते की, "अशा इंग्रजी शिव्या तुझ्याजवळच ठेवं, मी जर हिंदीतून एखादी शिवी दिली तर तुझं पूर्ण खानदान थडग्यातून बाहेर येईल. ओरडू नको चुडेल." या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. खुशीचा हा व्हिडीओ तिच्या फॅन क्लबने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
खुशी कपूर ही बोनी कपूरची (Boney kapoor) दुसरी पत्नी श्रीदेवी यांची मुलगी आहे. तर पहिली पत्नी मोना शौरी हिच्यापासून बोनी कपूरला मुलगा अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मुलगी अंशुला कपूर (Anshula kapoor) अशी अपत्य आहेत. सप्टेंबर 2019 पासून खुशी न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचा कोर्स करत आहे.