ऐन गरमीत जान्हवी कपूरने वाढवला पारा; पहिल्यांदाच शेअर केले असे HOT PHOTO

ऐन गरमीत जान्हवी कपूरने वाढवला पारा; पहिल्यांदाच शेअर केले असे HOT PHOTO

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र ही चर्चा तिच्या कोणत्याही आगामी चित्रपटाची नाही. ती सध्या मालदिव येथे सुट्टयांचा आनंद घेत आहे. यावेळी तिने शेअर केलेले फोटोंची फॅन्समध्ये चर्चा आहे.

जान्हवी कपूर सध्या मालदिवमध्ये (Maldives) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिने तिच्या चाहत्यांसाठी आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. जान्हवी कदाचित पहिल्यांदाच अशा लूकमध्ये दिसली. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.

फोटोत पाहू शकता जान्हवीने निळ्या कलरचा स्विमसूट घातलं आहे आणि वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. मावळता सूर्य, निळंशार पाणी आणि जान्हवीच्या या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे.

हे वाचा - शाहरुखच्या लेकिने परिधान केला इतक्या लाखांचा ड्रेस

एका फोटोमध्ये जान्हवी कॅमेऱ्याकडे पाहत हसताना दिसून येत असून दुसऱ्या फोटोत ती स्विमसूट मध्ये (Swimsuit) उभी असल्याचे दिसते. जान्हवीचा रूही (Rohhi) चित्रपटाचा सहकलाकार वरुण शर्मा तसंच 9 लाख फॅन्सने ही पोस्ट लाईक केली आहे. या फोटोंवर हॉट अशा प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी फायर, हार्ट्सचे इमोजी टाकले आहेत.

गेल्या रविवारी जान्हवी कपूरने तिची बहिण खुशी हिच्यासोबत न्यूयॉर्क शहरात भटकंती करतानाचे फोटो शेअर केले होते. यावेळी तिने खुशीसोबतचे देखील काही फोटो शेअर केले होते. त्यात या दोघी बहिणी एका ठिकाणी भोजनाचा आनंद घेताना दिसल्या.

हे वाचा - ‘त्यानं केवळ माझा वापर केला’; अनुषा दांडेकर एक्स बॉयफ्रेंडवर संतापली

जान्हवी कपूर नुकतीच रुही या चित्रपटात दिसली. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजेन आणि मृगदिपसिंह लांबा यांनी केली आहे. या चित्रपटात प्रथमच राजकुमार राव आणि जान्हवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. कोविड -19 च्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सिनेमागृहे 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा जोरदार हिट ठरला.

First published: April 10, 2021, 11:26 PM IST

ताज्या बातम्या