Home /News /entertainment /

वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू

वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhavi kapoor) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये ती वर्क आऊट करताना अचानक 'शीला की जवानी' हे गाणं गात आहे. तिचा हा मजेदार व्हिडीओ (Work out funny video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पुढे वाचा ...
  मुंबई, 12 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) अलीकडेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिने खूप कमी काळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी ही बॉलिवूडमधील सर्वात फिट (Janhavi kapoor fitness) अभिनेत्रींपैकी एक आहे. कोरोना काळात अनेकांचं दैनंदिन वेळापत्रक कोलमडलं असताना जान्हवी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. अलिकडेचं तिचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ती वर्कआऊट (Workout viral video) करताना दिसत आहे. वर्कआऊट करताना तिनं अचानक मध्येचं 'शीला की जवानी' गाणं गायलं (Sung Sheila ki Jawani) आहे. तिचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर वर्कआऊट करत आहे. खरंतर यावेळी ती थोडा अवघड वर्कआऊट करताना दिसत आहे. दरम्यान स्वतः ला प्रोत्साहन देण्यासाठी तिने कतरीना कैफचं 'शीला की जवानी' हे गाणं गायलं आहे. जान्हवीने अचानक 'शीला की जवानी' गाणं गायल्यानं तिच्या ट्रेनरलाही हसू आवरलं नाही. तिने हसायला सुरुवात केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Tony Wick (@tonywick_sharma)

  दरम्यान तिचा वर्कआऊट करताना तिची पॉस्चर बिगडली आहे. यावेळी तिच्या ट्रेनरने तिला पाठ सरळ करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमधील जान्हवीची निरागसता सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. अनेक चाहत्यांनी तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अनेकांनी कमेंट करून तिच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. हे ही वाचा- समुद्रकिनारी जाऊन जान्हवी कपूरने पुन्हा अनुभवलं बालपण; म्हणाली... जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाला अनेकांनी नावाजलं आहे. या चित्रपटात जान्हवी सोबतचं अभिनेता पंकज त्रिपाठीनेही अप्रतिम भूमिका साकारली आहे. त्यामुळेच जान्हवीला यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. जान्हवी कपूर सध्या 'दोस्ताना-2' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गुड लक जेरीमध्ये जान्हवी कपूर एका पंजाबी शाळकरी मुलीची व्यक्तीरेखा साकारत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Janhavi kapoor, Song, Viral video on social media

  पुढील बातम्या