श्रीदेवींची लेक स्वतःला मानते अंधश्रद्धाळू, वाचा काय आहे कारण

श्रीदेवींची लेक स्वतःला मानते अंधश्रद्धाळू, वाचा काय आहे कारण

जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःबद्दल एक नवा खुलासा केला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं मागील वर्षी ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिचा कोणताही कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. लवकरच जान्हीवीचे एकामागोमाग एक 2 सिनेमे रिलीज होत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं तिचा आगामी सिनेमा 'रूही आफ्जा'चं शूटिंग सूरू केलं. पण जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःबद्दल एक नवा खुलासा केला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना जान्हवीनं स्वतःला अंधश्रद्धाळू म्हटलं आहे. ती म्हणाली, माझ्या सिनेमाचं शूटिंग खूप चांगलं चाललं आहे. तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणा किंवा जुन्या विचारांची. मला वाटतं की, मी जर माझ्या सिनेमाबाबत जास्त बोलेन तर माझ्या सिनेमाला नजर लागेल असं मला वाटतं.

दिशा पाटनीनं केली टायगरची कॉपी, सोशल मीडियावर बॅक फ्लिपचा VIDEO VIRAL

 

View this post on Instagram

 

💭🌈

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी पुढे म्हणाली, या कारणासाठी मी माझ्या सिनेमांबाबत जास्त बोलणार नाही. या सिनेमाचा भाग असणं आणि या सिनेमातील इतर कलाकारांसोबत काम करणं यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. रूही-अफ्जा या सिनेमात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. हा एक हॉरर आणि कॉमेडीचं मिश्रण असलेला सिनेमा आहे. या दोघांव्यतिरिक्त फुकरे फेम अभिनेता वरुण शर्मा सुद्धा या सिनेमामध्ये दिसणार आहे. येत्या 20 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण? बिग बॉस 13च्या स्पर्धकसोबत करणार रोमान्स

 

View this post on Instagram

 

🕡🕟🕖🕙

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

याशिवाय जान्हवी गुंजन सक्सेनाचा बायोपिक सिनेमा ‘कारगिल गर्ल’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच धर्मा प्रोडक्शनच्या 'तख्त'मध्येही तिची महत्त्वाची भूमिका आहे. जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर तिची बराच मोठा चाहता वर्ग आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला Filmfare Award, पाहा यंदा कोणी मारली बाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2020 01:22 PM IST

ताज्या बातम्या