Home /News /entertainment /

सारा अली खानला करायचंय Vijay Deverakonda सोबत काम परंतु 'या' अभिनेत्रीने मारली बाजी

सारा अली खानला करायचंय Vijay Deverakonda सोबत काम परंतु 'या' अभिनेत्रीने मारली बाजी

लायगर' चे दिग्दर्शक विजय देवरकोंडासोबत आणखी एक चित्रपट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आगामी चित्रपटात या बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे.

    मुंबई, 28 जानेवारी-   साऊथ सुपरस्टार   (South Actor)   विजय देवरकोंडा   (Vijay Devarkonda)  सध्या त्याच्या आगामी 'लायगर''   (Liger)  या चित्रपटामुळे चर्चेत आहे ज्यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत  (Ananya Pandey)  दिसणार आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन (Mike Tyson)  देखील या चित्रपटात दिसणार आहे. पुरी जगन्नाथ  (Puri Jagannadh)  या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान, 'लायगर' चे दिग्दर्शक विजय देवरकोंडासोबत आणखी एक चित्रपट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आगामी चित्रपटात या बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे. टॉलीवुड फिल्म सर्कलच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक पुरी जगन्नाध पुन्हा एकदा विजय देवरकोंडासोबत काम करणार आहेत. आणि यावेळी ते आपल्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला कास्ट करणार आहेत. अशा परिस्थितीत, सारा अली खानसाठी ही खेदाची बाब असू शकते. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सारा अली खानने विजय देवरकोंडासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.परंतु यासाठी साराला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या जान्हवी कपूरसाठी ही मोठी संधी ठरू शकते. सध्या ते तेलुगु-हिंदी चित्रपट लायगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा चित्रपट पूर्ण होईल. नंतर तो पोस्ट प्रॉडक्शन होईल. या चित्रपटाचं काम पूर्ण केल्यानंतर जगन्नाथ त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून या विषयावर बरीच चर्चा होत असल्याचं म्हटलं जात आहे. पुरी जगन्नाथ लायगरची निर्माती चार्मी कौरसोबत नवीन चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. रंतु मेकर्स लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (हे वाचा:गंगूबाई काठियावाडी' ची नवी रिलीज डेट OUT, या दिवशी चित्रपट येणार भेटीला) सध्या जगन्नाथ पुरी यांचं संपूर्ण लक्ष विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर लायगर या चित्रपटावर आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याच्या लूकव्यतिरिक्त, त्याने त्याच्या फिटनेस दिनचर्यामध्ये देखील बदल केला आहे. यासोबतच अभिनेत्याने थायलंडमधील स्टंट कोरिओग्राफरकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतलं आहे. लायगरमध्ये विजय देवरकोंडा रिंगमध्ये माइक टायसनचा सामना करेल. तो बोबडणाऱ्या किकबॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Janhavi kapoor, Sara ali khan, Vijay deverakonda

    पुढील बातम्या