मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वर्कआऊट करताना खुशी कपूरच्या पोटावर बसला पांडा आणि...; जान्हवीने शेअर केला व्हिडीओ

वर्कआऊट करताना खुशी कपूरच्या पोटावर बसला पांडा आणि...; जान्हवीने शेअर केला व्हिडीओ

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरचा (Khushi Kapoor) हा पांडासोबतचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरचा (Khushi Kapoor) हा पांडासोबतचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरचा (Khushi Kapoor) हा पांडासोबतचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 06 जुलै : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) सोशल मीडियावर (social media) चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. त्या सोशल मीडियावर नवनव्या पोस्ट चाहत्यांशी शेअर करत असतात. दोघीही फिटनेस फ्रीक आहेत. त्यामुळे त्या त्यांच्या वर्कआउट आणि जिम अॅक्टिव्हिटीजचे व्हिडिओही बऱ्याचदा शेअर करतात. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओज चाहत्यांना आवडतात आणि त्यांना भरभरून लाइक्स आणि कॉमेंट्स मिळतात. नुकतंच या दोघी बहिणींनी पिलेट्स क्लास जॉइन केला आहे. दोघीही वर्कआउटनंतर फोटो, व्हिडिओ शेअर करतात.

    जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांच्यासोबत 'पांडा'ही दिसतो आहे. हा पांडा चक्क खुशीच्या पोटावर बसला आहे.

    जान्हवीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चर्चा होते आहे ती पांडाची. खुशी पिलेट्स मशीनवर वर्कआउट (work out) करते आहे आणि जान्हवी या व्हिडिओत तिचे अॅब्स बघते आहे. तर खुशीच्या पोटावर एक कुत्रा बसलेला दिसतो आहे, हाच तो पांडा. पांडा हे त्यांच्या पाळीव कुत्र्याचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये पांडा खूपच क्यूट दिसत आहे आणि अगदी निरागस बाळासारखा तो खुशीच्या पोटावर बसलेला आहे.

    हे वाचा - 'या' कारणामुळे झाली दिलीपकुमार-मधुबालाच्या प्रेमाची 'ट्रॅजेडी'

    कोरोनामुळे लॉकडाऊन (corona lockdown) लागू झाल्याने खुशी आणि जान्हवी दोघीही घरीच वेळ घालवत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पेट डॉग पांडाही होता. लॉकडाउनच्या काळात त्यांनी शेअर केलेल्या बऱ्याच फोटो आणि व्हिडिओमध्ये पांडादेखील दिसत होता. महत्त्वाचं म्हणजे पांडा जान्हवीसोबत एका फॅशन मॅगझिनच्या कव्हरवरदेखील झळकला आहे. या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तसंच दोघंही फोटोत खूप क्यूट दिसत असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर लाइक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला.

    हे वाचा - 'TV पे ब्रेकिंग न्यूज हाय रे मेरा घागरा'! माधुरीच्या लेहंग्याची किंमत ऐकूनच थक्क

    वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबतचा रुही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जान्हवीने नुकतंच तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. पंकज मट्टा लिखित आणि सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय ती ‘दोस्ताना 2’मध्येही दिसणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood, Entertainment, Janhavi kapoor