VIDEO : माझे वडील माझा जीवच घेणार आहेत, म्हणतेय जान्हवी कपूर

जान्हवी कपूरचा नवा हाॅट लूक समोर आलाय. पण तरीही तिला भीतीही वाटतेय. कसली?

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 03:11 PM IST

VIDEO : माझे वडील माझा जीवच घेणार आहेत, म्हणतेय जान्हवी कपूर

मुंबई, 31 डिसेंबर : 2018 हे वर्ष जान्हवी कपूरसाठी महत्त्वाचं गेलं. तिच्या धडक सिनेमाला बाॅक्स आॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय तिला करण जोहरच्या 'तख्त'मध्येही काम मिळालं. जान्हवीचा लूक देशी आहे. तिचे केसही खांद्यापुढे जातात. पण आता तिचं हे लूक पाहायला मिळणार नाही.

अभिनेत्री जान्हवी कपूरनं एका मॅगझीन फोटोशूटसाठी नवा लूक धारण केलाय. कॉस्मोपॉलिटन मासिकासाठी तिनं हे फोटोशूट केलंय. केस कापल्यामुळे माझे वडील माझा जीव घेणार आहेत, त्यांना मी केस कापलेले आवडत नाही, असं जान्हवीनं गमतीनं म्हटलंय. जान्हवीच्या या नव्या हॉट लूकमुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.


तख्तनंतर तिला आणखी एक सिनेमा मिळालाय. त्यात ती लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारतेय. शरन शर्मा सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अजून या सिनेमाची आॅफिशल अनाऊन्समेंट झाली नाही.

मध्यंतरी, जान्हवी काॅफी विथ करणमध्ये आली होती. करणनं जान्हवीला रॅपिड फायरमध्ये राजकुमार राव, विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मान खुराना यांपैकी सर्वात जास्त आवडता अभिनेता कोण आहे? त्यावर ती म्हणाली राजकुमार राव, विकी कौशल. पुढे ती हेही म्हणाली, राजकुमार राव तिचं पहिलं प्रेम आहे. तो अभिनेता म्हणून तिला खूप आवडतो.

Loading...


Year Ender 2018 : कुस्तीव्यतिरिक्त राणादा 'या'मध्येही आहे तरबेज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...