S M L

जान्हवी आणि अर्जुन कपूर यांच्या वाट्याला सारखंच दु:ख, दुर्दैवी योगायोग!

धडक जुलैत रिलीज होईलही पण त्यावेळी जान्हवीचं कौतुक करायला तिची लाडकी आई नसेल.

Sonali Deshpande | Updated On: Feb 25, 2018 03:25 PM IST

जान्हवी आणि अर्जुन कपूर यांच्या वाट्याला सारखंच दु:ख, दुर्दैवी योगायोग!

मुंबई २५ फेब्रुवारी : जान्हवी आणि खुशी या श्रीदेवीच्या लाडक्या मुली. जान्हवी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्यानं श्रीदेवी आनंदात होती. तिला प्रतिक्षा होती जान्हवीच्या पहिल्या रिमेकची. करण जोहरचा धर्मा प्रॉडक्शन जान्हवी आणि ईशान खट्टरला घेऊन `धडक’ नावाचा रिमेक बनवताहेत.

धडक ही मराठीतल्या गाजलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती. याचं शूटिंगही सध्या सुरू आहे. श्रीदेवीचं या शूटिंगकडे खास लक्षं होतं. तर जान्हवीला अभिनयाच्या टिप्स आईकडून मिळत असल्यानं मोठा आधार वाटत असे.

आता तिचा हा आधारच गेलाय. २० जुलै २०१८ ला धडक रिलीज होणार होता आणि श्रीदेवीला जान्हवीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता होती. धडक जुलैत रिलीज होईलही पण त्यावेळी जान्हवीचं कौतुक करायला तिची लाडकी आई नसेल.

अर्जुन कपूरच्याही वाट्याला असंच दु:ख

सहा वर्षांपूर्वी जान्हवीचा सावत्र भाऊ अभिनेता अर्जुन कपूरलाही याच दु:खातून जावं लागलं होतं. बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना यांचा अर्जुन हा मोठा मुलगा. २०१२ मध्ये ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अर्जुनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र अर्जुनची आई मोना कपूर यांचं मार्च २०१२ मध्येच निधन झालं.

'मी पहिल्यांदा पडद्यावर आलो ते बघायला माझी आई नव्हती याचं दु:ख आयुष्यभर राहील,' अशी खंत अर्जुनने अनेकदा मुलाखतीत बोलून दाखवली होती. आता तेच दु:ख जान्हवीच्याही वाट्याला आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2018 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close