Article 370 : सिनेमाच्या 'या' नावासाठी चढाओढ; काश्मीरवर सिनेमा करायला निर्मात्यांची लागली रीघ

Article 370 : सिनेमाच्या 'या' नावासाठी चढाओढ; काश्मीरवर सिनेमा करायला निर्मात्यांची लागली रीघ

जम्मू काश्मीरला स्वायत्ततेचा विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय झाला त्याला दोन दिवससुद्धा उलटले नाहीत, आणि आता फिल्ममेकर्सना या विषयीचा चित्रपट बनवायचे वेध लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : जम्मू काश्मीरला स्वायत्ततेचा विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय झाला त्याला दोन दिवससुद्धा उलटले नाहीत, आणि आता फिल्ममेकर्सना या विषयीचा चित्रपट बनवायचे वेध लागले आहेत. या विषयीच्या सिनेमाला Article 370 किंवा धारा 370 असं नाव देता यावं यासाठी निर्मात्यांनी Indian Motion Pictures’ Producers’ Association (IMPPA) कडे रीघ लावली आहे. यातलं सर्वांत लोकप्रिय नाव ठरतंय - कश्मीर हमारा है! या नावासाठी तब्बल 20 ते 30 निर्मात्यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नोंदणी केली आहे.

द क्विंटने दिलेल्या बातमीनुसार कलम 370 हटवण्याविषयी हलचाली सुरू झाल्या झाल्या निर्मात्यांनी चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली असावी. कारण लगेचच चित्रपटाच्या शीर्षकाच्या नोंदणीसाठी 20 ते 30 निर्माते मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनकडे गेले. त्यांनी Article 370 and Article 35A या नावासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय कश्मीर हमारा है, धारा 35A, धारा 370 अशी नावं हिंदी चित्रपटांना देण्यासाठी निर्माते असोसिएशनकडे आले आहेत. IMPPA ही निर्मात्यांची संघटना या सर्व अर्जांचा विचार करून सिनेमाच्या टायटलविषयी आपला निर्णय लवकरच देईल. यापूर्वी निर्मात्यांच्या या संघटनेकडे अशा प्रकारे निर्मात्यांनी रीघ लावली होती पुलवामा या शीर्षकासाठी.

VIDEO : कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ही आहे स्थिती

'अभिनंदन', 'बालाकोट' आणि 'पुलवामा' या शीर्षकांसाठी चढाओढ लागली होती. बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक्स 2 आणि पुलवामा या शीर्षकांसाठी तर निर्मात्यांच्यात वादविवाद आणि भांडणं झाल्याचं वृत्त हफिंग्टन पोस्टने दिली होती. आता काश्मीरविषयी चित्रपटनिर्मात्यांना असलेली सिनेमा बनवण्याची उर्मी बघता Article 370 आणि 'कश्मीर हमारा है'साठीसुद्धा अशीच भांडणं होणार का, हे बघावं लागेल. या 20 ते 30 निर्मात्यांमध्ये मोठे बॅनर कोण, आघाडीचे निर्माते कोण याविषयी अजून माहिती उपलब्ध झालेली नाही.

'या' 20 गोष्टींमुळे सुषमा स्वराज यांना तुम्ही कधीही विसरू शकणार नाही!

विकी कौशल अभिनित सर्जिकल स्ट्राईकला बॉक्स ऑफिसवर तुफानी यश मिळालं. हा चित्रपट प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईक्सनंतर लगेचच प्रदर्शित झाला. त्यामुळे शीर्षकाचा फायदा या चित्रपटाला मिळाला.

----------------------------------------------------------------------

VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

First published: August 7, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading