• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेते James Michael यांचे निधन; अनुष्का शर्मासह अन्य कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

‘फ्रेंड्स’ फेम अभिनेते James Michael यांचे निधन; अनुष्का शर्मासह अन्य कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Actor James Michael Tyler

Actor James Michael Tyler

हिट सिटकॉम “फ्रेंड्स”(Friends) वर कॉफी शॉप मॅनेजर गुंथरची भूमिका करणारा अभिनेता जेम्स मायकेल टायलर (Actor James Michael Tyler) यांचे रविवारी वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ला, 25 ऑक्टोबर : हिट सिटकॉम “फ्रेंड्स”(Friends) वर कॉफी शॉप मॅनेजर गुंथरची भूमिका करणारा अभिनेता जेम्स मायकेल टायलर (Actor James Michael Tyler) यांचे रविवारी वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर अभिनेत्री अनुष्का शर्मासह (anushka sharma) अन्य कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. जून २०२१ मध्ये एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत मायकलने त्याला स्टेज फोरचा कॅन्सर असल्याचं जाहीर केलं होतं. २०१८ पासून तो कॅन्सरशी लढत होता. मात्र आज पहाटे त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या कुटुंबियांनी एक पत्रक जारी केलं आहे. टायलर यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकारांनी त्यांच्यासोबतचे काही क्षण शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. “फ्रेंड्स” मध्ये गुंथरसोबत अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन हीने, सिटकॉममधील एक आयकॉनिक दृश्य शेअर केले. आणि ''मित्रा, तुझ्यासारखेच जगात सगळे नसतात. आमच्या सर्वांच्या आयुष्यात आणलेल्या हास्याबद्दल धन्यवाद. तुझी खूप आठवण येतीय'' अशी कॅप्शन लिहित अॅनिस्टन हीने टायलर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
  तसेच, बी टाऊनची अभिनेत्री अनुष्का शर्मानेदेखील आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टायलर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. फ्रेण्ड्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुनही त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय. तो आमच्या फ्रेण्ड्स कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Friends (@friends)

  काय म्हटले आहे कुटुंबियांनी जारी केलेल्या पत्रकात?

  ''जग त्याला गंथर नावाने ओळखायचे मात्र त्याच्या जवळचे त्याला एका अभिनेता, गीतकार, कॅन्सरबद्दल जागृती करणारा आणि प्रेम नवरा म्हणून ओळखत होते. मायकलला लाइव्ह म्युझिक फार आवडायचं. त्याला एकदा भेटलात तरी तुम्ही आयुष्यभर त्याचे मित्र होता, असा होता तो.''
  Published by:Dhanshri Otari
  First published: