मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! हॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या रडारवर, जेम्स बाँडमधील अभिनेत्रीला झाली लागण

OMG! हॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या रडारवर, जेम्स बाँडमधील अभिनेत्रीला झाली लागण

कोरोनाची (Coronavirus) दहशत जगभरात पसरली आहे. काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा कोरोनाच्या रडारवर आहेत.

कोरोनाची (Coronavirus) दहशत जगभरात पसरली आहे. काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा कोरोनाच्या रडारवर आहेत.

कोरोनाची (Coronavirus) दहशत जगभरात पसरली आहे. काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा कोरोनाच्या रडारवर आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 16 मार्च : कोरोनाची (Coronavirus) दहशत जगभरात पसरली आहे. आर्थिक नुकसानाबरोबरच मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा कोरोनाच्या रडारवर आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ओल्गा कुरिलेन्कोने (Olga Kurylenko) खुलासा केला आहे की ती कोरोनाव्हायरस पॉसिटीव्ह आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. 2008 च्या जेम्स बाँड चित्रपटाच्या क्वांटम ऑफ सोलेस (2008's James Bond film Quantum of Solace) आणि 2013 ची साय-फाय फिल्म ओब्लिव्हियनमध्ये (2013's sci-fi movie Oblivion) मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ती घरीच बंद आहे. यासंदर्भात ओल्गाने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. (हे वाचा- Corona च्या थैमानामुळे WHO च्या संचालकांनी दीपिका-प्रियांकाला केली ही विनंती) ओल्गाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबाबत तिने कोरोना व्हायरसबाबत केलेली चाचणी पॉसिटीव्ह आल्याचं लिहिलं आहे. तिने तिच्या घराच्या खिडकीतील एक फोटो शेअर केला आहे. ‘कोरोनाचं निदान झाल्यामुळे घरीच बंद’ अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. ती पुढे असं म्हणाली आहे की, ‘ मी आता जवळपास एका आठवड्यापासून आजारी आहे. ताप आणि थकवा ही माझी मुख्य लक्षणे आहेत. स्वतःची काळजी घ्या आणि हे गांभीर्याने घ्या!’
गेल्या आठवड्यात कलाकार जोडी टॉम हँक्स आणि रीटा विल्सन यांची देखील कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. युनिव्हर्सल म्युझिक चेअरमन आणि सीईओ लुसियन ग्रेनगे यांना आठवडाभरासाठी संक्रमणाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जगातील अनेक ठिकाणी सिनेमागृहे बंद आहेत, त्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन पुढे ढकलण्याल आलं आहे. या महिन्यात प्रदर्शित होणारा जेम्स बाँड चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ हा चित्रपट देखील नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
First published:

पुढील बातम्या