सातवेळी जेम्स बाॅन्डची भूमिका साकारणारे अभिनेते राॅजर मूर काळाच्या पडद्याआड

बाॅन्डची भूमिका साकारणारे ते तिसरे अभिनेते होते. 1973 पासून ते 1985 पर्यंत त्यांनी बाॅन्डची भूमिका साकारली होती.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 23, 2017 08:36 PM IST

सातवेळी जेम्स बाॅन्डची भूमिका साकारणारे अभिनेते राॅजर मूर काळाच्या पडद्याआड

23 मे : तब्बल सातवेळी जेम्स बाॅन्डची भूमिका साकारणारे अभिनेते राॅजर मूर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून राॅजर मूर यांना कँन्सरने ग्रासले होते. आपल्या या अखेरच्या काळात ते आपल्या कुटुंबियासोबत स्विझरलँड इथं राहत होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची माहिती दिली टिवटरवर दिली.

राॅजर यांनी 'दि स्पाई हु लव्ह मी' आणि 'लिव अँड लेट डाई' सारख्या सुपरहीट बाँड सिनेमात काम केलंय.

बाॅन्डची भूमिका साकारणारे ते तिसरे अभिनेते होते. 1973 पासून ते 1985 पर्यंत त्यांनी बाॅन्डची भूमिका साकारली होती.

राॅजर यांना सलग सात वेळा बॅान्डची भूमिका देण्यामागे कारण होतं की, त्यांनी जेम्स बाॅन्डची भूमिका साकारलेले शाँ कोनरी सारख्या दमदार अभिनेत्याकडून मिळवली होती.

Loading...

राॅजर यांनी जेम्स बाॅन्ड व्यतिरिक्त लोकप्रिय टीव्ही सीरिअल 'दी सेंट' मध्येही काम केलं होतं. या सीरिअलमधील 'साईमन टेंपलर' व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या लक्षात आहे.

चित्रपटाव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक आयुष्यही चांगलं होतं. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी 'नाईटहुड'ची उपाधी देण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...