मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेता अनु कपूरसोबत घडला 'जामतारा'सारखा कांड; बँकेतून फोन आला अन् लाखो रुपये उडाले

अभिनेता अनु कपूरसोबत घडला 'जामतारा'सारखा कांड; बँकेतून फोन आला अन् लाखो रुपये उडाले

तुम्हाला असा कॉल आला तर सावधान..अशी चूक कधीच करू नका

तुम्हाला असा कॉल आला तर सावधान..अशी चूक कधीच करू नका

तुम्हाला असा कॉल आला तर सावधान..अशी चूक कधीच करू नका

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 1 ऑक्टोबर : बॉलिवूड चित्रपट अभिनेता अनु कपूरसोबत फ्रॉडची घटना घडली आहे. त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनु कपूर यांनी पोलिसात याबाबत तक्रार नोंदवली आहे. नेटक्लिक्सवरील जामतारा या वेब सीरिजप्रमाणे अनु कपूर यांचीही फसवणूक करण्यात आली आहे.

एका प्रायव्हेट बँकेतून अनु कपूर यांना फोन आला होता. त्यांना यावेळी खात्याशी संबंधित KYC अप़डेट करण्यास सांगण्यात आलं. असं करीत त्यांच्या खात्यातून तब्बल साडे चार लाख रुपये काढण्यात आले.

Bhabi Ji Ghar Par Hai: धक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन

अभिनेत्यासोबत झाला फ्रॉड...

अनु कपूरला बँकेच्या एका कर्मचाऱ्याला फोन आला. गुरुवारचा दिवस होता. अनु कपूरला बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, त्यांना केवायसी फॉर्म अपडेट करावं लागेल. यानंतर अनु कपूरने त्याच्यासोबत आपले बँक डिटेल्स शेअर केले. सोबतच ओटीपीदेखील शेअर केला. या संपूर्ण घटनेबाबत ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

बोलणं झाल्यानंतर कॉलरने त्यांचा कॉल दुसरीकडे ट्रान्सफर केला. कपूरच्या बँक अकाऊंटमधून 4.36 लाख रुपये काढण्यात आले होते. कर्मचाऱ्याने दोन वेळेत ही रक्कम बँकेतून काढली. पैसे काढल्यानंतर बँकेकडून अनु कपूर यांना फोन आला आणि त्यांच्या बँकेतून पैसे काढल्याचा प्रकार उघडकीस आला.

जामतारा वेब सीरिजची चर्चा

नेटफ्लिक्सवरील जामतारा या वेब सीरिजमध्ये सायबर क्राइममधील गुन्हेगारीचा विषय मांडण्यात आला आहे. यामध्ये फोन करून नागरिकांची फसवणूक केली जाते. अनेकदा बँक कर्मचारी किंवा लॉटरीचं कारण सांगून नागरिकांकडून पैसे उकळले जातात. मोबाइल जगतात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

First published: