तुला का जिंकायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर देऊन टोनी अ‍ॅन सिंग झाली विश्वसुंदरी

तुला का जिंकायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर देऊन टोनी अ‍ॅन सिंग झाली विश्वसुंदरी

अखेरच्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंगनं आपल्या उत्तरानं परीक्षकांची मनं जिंकत विश्वसुंदरीचा मुकूट आपल्या नावे केला.

  • Share this:

लंडन, 15 डिसेंबर : मिस यूनिव्हर्स 2019 नंतर शनिवारी रात्री उशीरा मिस वर्ल्ड 2019 ची घोषणा करण्यात आली. लंडनमध्ये झालेल्या सोहळ्यात जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंग हीने मिस वर्ल्ड 2019 चा मुकुट पटकावला. यामध्ये फ्रान्सची ओफिली मेजिनो उपविजेती ठरली तर भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत 120 देशांच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अखेरच्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंगनं आपल्या उत्तरानं परीक्षकांची मनं जिंकत विश्वसुंदरीचा मुकुट आपल्या नावे केला.

मिस वर्ल्ड 2019 ही स्पर्धा शनिवारी रात्री लंडनमध्ये पार पडली. यावेळी शेवटच्या टॉप 5 मध्ये जमैका, फ्रान्स, भारत, ब्राझील, नायजेरिया या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावलं. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत टोनीच्या उत्तरानं तिला मिस वर्ल्डचा मुकुट मिळवून दिला. तिला या फेरीत ‘तुझ्यात असं काय खास आहे ज्यामुळे तु जिंकशील असं तुला वाटत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर टोनीनं फार सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, मला वाटतं मी ज्यांचं प्रतिनिधीत्त्व करते ते खूप खास आहे. मी अशा स्त्रियाचं प्रतिनिधीत्त्व ज्या जग बदलण्यासाठी पुढे येत आहेत. मी असं नाही म्हणत की मी सध्या ज्या मंचावर उभी आहे त्यांच्यापेक्षा मी वेगळी आहे. पण स्त्रियांसाठी काम करण्याची माझी तळमळ आणि आवड हे मात्र इतरांपेक्षा वेगळं आहे. तसेच मला ज्या संधी मिळाल्या आहेत. त्यातून मी हे सिद्ध केले आहे की मी इतरांसाठी एक चांगलं उदाहरण सेट करेन.

टोनीला विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न असा होता, ‘तुझ्यासाठी सर्वात प्रेरणादायी स्त्री कोण आहे?’ यावर टोनीनं सांगितलं, माझी आई ही माझ्यासाठी नेहमीच प्रेरणा आहे. जर मी वृक्ष आहे तर माझे आई-वडील या वृक्षाची मूळं आहेत. कारण माझ्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळे मी केललं कोणतंही कार्य किंवा जग बदलवून टाकणारी गोष्ट ही त्यांच्या आतापर्यंतच्या श्रमांचं फलित आहे. केवळ त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभी राहण्यासाठी सक्षम आहे.’

टोनी टोनी अ‍ॅन सिंगच्या या उत्तरांनी तिनं मिस वर्ल्ड 2019चा मुकूट आपल्या नावे करत सौंदर्याची परिभाषाच बदलली. टोनी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची सायकलॉजी विषयाची विद्यार्थीनी आहे आणि तिला डॉक्टर व्हायचं आहे. याशिवाय या स्पर्धेत फ्रान्सच्या ओपेली मेजिनो ही दुसऱ्या स्थानावर तर भारताची सुमन रावनं तिसऱ्या स्थानावर राहिली. राजस्थानच्या 21 वर्षीय सुमन रावनं मिस इंडिया 2019चा किताब पटकावला होता. तिला भविष्यात अभिनेत्री व्हायचं आहे. ती एका अशा भागातून आली आहे ज्या ठिकाणी आजही महिलांवर अनेक बंधन आहेत. त्यामुळे अशा महिलांसाठी भविष्यात काहीतरी करण्याचा तिचा मानस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: miss world
First Published: Dec 15, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या