खंडोबा,म्हाळसा आणि बानू होतायत अंतर्धान

खंडेराय आता लवकरच टीव्हीवरून अंतर्धान पावणार आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2017 02:48 PM IST

खंडोबा,म्हाळसा आणि बानू होतायत अंतर्धान

31 मार्च : खंडेराय आता लवकरच टीव्हीवरून अंतर्धान पावणार आहेत. झी मराठीवरची लोकप्रिय मालिका जय मल्हार लवकरच रसिकांचा निरोप घेण्याची चिन्ह आहेत. या मालिकेचे 900हून अधिक एपिसोडस आतापर्यंत झाले आहेत.

खंडोबा,म्हाळसा आणि बानू हे कैलासात जाण्याचं दाखवून ही मालिका संपणार असल्याचं बोललं जातंय. घराघरात ही मालिका फार आवडीनं पाहिली जायची. म्हाळसा आणि बानू यांची भांडणं, खंडेरायाची दोघांमध्ये होणारी ओढाताण प्रेक्षकांना आवडली होती.

शिवाय मालिकेमधले भव्य दिव्य सेट्स,वेशभूषा,दागिने हे सर्वच दिपवणारं होतं.'जय मल्हार'च्या टीआरपी यशानंतर टीव्हीवर पौराणिक मालिकांचा ट्रेंडच निर्माण झाला होता.

पण गेले काही दिवस ही मालिका एकसुरी होत चाललेली. त्यामुळे आता ती प्रेक्षकांचा निरोप घेणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...