मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Devdatta Nage: जय मल्हार पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार; 'या' मालिकेत घेणार एन्ट्री

Devdatta Nage: जय मल्हार पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार; 'या' मालिकेत घेणार एन्ट्री

देवदत्त नागे

देवदत्त नागे

देवदत्तने जय मल्हार मालिकेतील खंडोबा दैवताची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. आता हा अभिनेता पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर परतण्यास सज्ज झाला आहे. लवकरच देवदत्त छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेत एंट्री घेणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 02 डिसेंबर : जय मल्हार मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला देवदत्त नागेनं हिंदी सिनेमात काम करायला सुरू केल्यानंतर त्यानं मोठी भरारी घेतली आहे. मराठी टेलिव्हिजनवर तो प्रसिद्ध होताच मात्र प्रभासबरोबर आदिपुरूषमध्ये राम भक्त आदिपुरुषच्या भूमिकेत देवदत्त प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हनुमानाच्या वेशातील देवदत्तचा पहिला लुक समोर आला आहे. देवदत्तने जय मल्हार मालिकेतील खंडोबा दैवताची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. अजूनही प्रेक्षकांच्या तो चांगलाच लक्षात आहे. आता हा अभिनेता पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर परतण्यास सज्ज झाला आहे. लवकरच देवदत्त छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेत एंट्री घेणार आहे.

देवदत्त नागे लवकरच कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत एंट्री घेणार आहे. या मालिकेत देवदत्त  तुषार देसाई हे महत्वपूर्ण पात्र साकारणार आहे. आता हे पात्र निगेटिव्ह असेल  कि मल्हार - अंतराला या कठीण परिस्थितीतून मदत करेल हे अजून समोर आलेलं नाही. मात्र मोठ्या पडद्यावर झळकत हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेला देवदत्त पुन्हा छोट्या पडद्यावर परतण्यासाठी आतुर झाला आहे.

हेही वाचा - हार्दिक-अक्षया नंतर 'माझा होशील ना फेम' अभिनेता अडकणार विवाहबंधनात; मेहंदी- संगीतचे फोटो आले समोर

'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतरा – मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोट्या त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये अंतराला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून अंतरा आणि मल्हारवरील संकंट कमी होण्याचे नाव घेत नाही. आणि आता देखील मल्हारच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची सर्जरी होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तिला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्जरी कशी निर्विघ्नपणे पार होईल हे अंतराच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हानं आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी अंतराने रेसमध्ये सहभागी होण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणि याच रेसमध्ये आयोजक म्हणून मालिकेत देवदत्त नागेची एंट्री होणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, ''मी जेव्हा हि मालिका बघितली तेव्हा माझा जीव त्याच्यामध्ये गुंतला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा मला या भूमिकेविषयी विचारणा झाली मी लगेच होकार दिला. हि भूमिका स्वीकारण्यामागे अजून एक उद्देश होता कि, एक चांगली मालिका जी ५०० भागांचा टप्पा लवकरच गाठणार आहे त्या मालिकेचा आपण एक भाग बनणं एक खरंच खूप महत्वाचं आहे. या पात्राबद्दल विचार केला, कसं पुढे जाणार आहे, पात्र नक्की काय आहे, आणि प्रेक्षकांचा विचार केला... मला असं वाटलं हे तुषार देसाई पात्र नक्कीच तुम्हां प्रेक्षकांना आवडेल म्हणून होकार दिला. या character चा स्वभावचं तुम्ही समजू शकणार नाही असं मला वाटतं आणि हेच माझ्यासाठी आव्हानं आहे. कितीही काही म्हंटलं तरी मी कितीही हिंदी मराठी चित्रपट केले तरीसुद्धा मला टेलिव्हिजनने खूप काही दिलं आहे आणि टेलिव्हिजनवर असं character करणं हि माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे."

आगामी काळात देवदत्त बहूचर्चित  'आदिपुरूष' सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याआधी त्याला छोट्या पडद्यावर पाहणं  हि चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment, Marathi Serial