जान्हवी कपूरनं भावासमोर दिली आपल्या फर्स्ट लव्हची कबुली

जान्हवी कपूरनं भावासमोर दिली आपल्या फर्स्ट लव्हची कबुली

काॅफी विथ करणमध्ये जान्हवी आणि अर्जुन कपूर आले काय, एकच चर्चा सुरू झाली. आधीच दोघांचे फॅन्स खूप आहेत. त्यात करणचा शोही लोकप्रिय आहे. त्यामुळे एकेक गुपितं बाहेर आली.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : काॅफी विथ करणमध्ये जान्हवी आणि अर्जुन कपूर आले काय, एकच चर्चा सुरू झाली. आधीच दोघांचे फॅन्स खूप आहेत. त्यात करणचा शोही लोकप्रिय आहे. त्यामुळे एकेक गुपितं बाहेर आली.

करणनं जान्हवीला रॅपिड फायरमध्ये राजकुमार राव, विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मान खुराना यांपैकी सर्वात जास्त आवडता अभिनेता कोण आहे? त्यावर ती म्हणाली राजकुमार राव, विकी कौशल. पुढे ती हेही म्हणाली, राजकुमार राव तिचं पहिलं प्रेम आहे. तो अभिनेता म्हणून तिला खूप आवडतो.

करण जोहरनं जान्हवीसमोर अनेकदा ईशानचं नाव घेतलं. पण ती म्हणाली तो तिचा फक्त मित्र आहे.

या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा एपिसोड चांगलाच रंगलाय. यात दोघांमधले बंध चांगलेच जाणवतायत. अर्जुनला करणनं विचारलं, हल्ली प्रत्येक जण आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलायला घाबरत नाही. तू काय सांगशील ?

आपल्या बहिणीसमोर सेक्स लाईफबद्दल बोलायला अर्जुन चांगलाच लाजला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. इतर प्रश्नांची मात्र दोघांनी दिलखुलास उत्तरं दिली.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ या शोमध्ये आली होती. त्यात तिला प्रश्न विचारला की, तू प्रेमाकडे कसं पाहतेस? 'प्रेमात तुम्ही नेहमी पाहता की तुमचा जोडीदार तुमच्याकडे किती लक्ष देतोय, किती प्रेम करतोय. ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या संबंधांवर, रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकतो.' कतरिना म्हणते.

First published: November 27, 2018, 6:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading