Home /News /entertainment /

ED चौकशीत अडकलेल्या जॅकलिनने का सोडला नागार्जुनचा चित्रपट, समोर आलं मोठं कारण

ED चौकशीत अडकलेल्या जॅकलिनने का सोडला नागार्जुनचा चित्रपट, समोर आलं मोठं कारण

जॅकलिन फर्नांडिस नुकताच नागार्जुन यांचा 'द घोस्ट' या चित्रपटातून बाहेर पडली आहे.

     मुंबई, 15 जानेवारी-   बॉलिवूड   ( Bollywood )   कलाकार कधी कशामुळे चर्चेत येतील, याचा काही भरवसा राहिला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर बाॉलिवूडचे कलाकार हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा इतर प्रकारांमुळेच चर्चेत जास्त राहिले आहेत. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आदींचा समावेश आहे. आता या यादीत बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस   ( Jacqueline Fernandes)   हिचे सुद्धा नाव घ्यावे लागेल. कारण ती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने चर्चेत आहे. तिला याचमुळे 'द घोस्ट'   ( The Ghost )  चित्रपटामधून बाहेर पडावं लागल्याची चर्चा होती. मात्र त्याचं खरं कारण समोर आलं आहे. दैनिक जागरण ने याबाबत वृत्त दिलंय. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा (money laundering) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव आल्याने काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे संबंधही असल्याचे उघड झाले आहे. या वादामुळेच तिला नागार्जुन अक्किनेनीचा चित्रपट ( Nagarjuna Akkineni's film ) 'द घोस्ट' मधून बाहेर पडावं लागलं, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र आता खरं कारण समोर आले आहे. सर्वात प्रथम काजल अग्रवालला प्रवीण सत्तू दिग्दर्शित 'द घोस्ट' या चित्रपटात कास्ट करण्यात येणार असल्याची बातमी आली होती, पण काजलने गरोदर राहिल्यानंतर हा चित्रपट सोडला होता. दुसरीकडे जॅकलीन या चित्रपटाचा भाग नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कारण चित्रपटासाठी ज्या तारखा आवश्यक होत्या, त्या तारखांना जॅकलीन ही काम करण्यासाठी उपलब्ध नव्हती. हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच निश्चित झालं होतं. त्यानंतर तिने हा फिल्म प्रोजेक्ट सोडला होता. (हे वाचा:सलमान खानने शेजाऱ्याविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला, काय आहे नेमकं प्रकरण ) जॅकलीन फर्नांडिसचे नुकतेच सुकेश चंद्रशेखरनसोबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यातील काही इंटिमेट होते. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत मीडियाला ते फोटो प्रसारित न करण्याची विनंती केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, 'या देशातील लोकांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडियातील मित्रांचा समावेश आहे, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे. मी सध्या आयुष्याच्या वाईट टप्प्यातून जात आहे, पण लवकरच यातून बाहेर पडेन. मी मीडियातील माझ्या मित्रांना विनंती करते की, माझ्या वैयक्तिक आयुष्याताली असे काही फोटो वापरू नका. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत असं करणार नाही अशी अपेक्षा करते.' दरम्यान, जॅकलीन सध्या अक्षय कुमारसोबत 'राम सेतू' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांत दिसणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटातही ती दिसणार आहे. सध्या ती ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली असल्यामुळे चर्चेत आहे.
    First published:

    Tags: Entertainment, Jacqueline fernandez

    पुढील बातम्या