मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा जावं लागणार ED ला सामोरं; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज दिल्लीत होणार चौकशी

जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा जावं लागणार ED ला सामोरं; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज दिल्लीत होणार चौकशी

जॅकलिन फर्नांडिस   (Jacqueline Fernandez)  सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात   (Money Laundering Case)  जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,8  डिसेंबर-   जॅकलिन फर्नांडिस   (Jacqueline Fernandez)  सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात   (Money Laundering Case)  जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. अभिनेत्रीला आज दिल्लीत पुन्हा ईडीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहेत.या प्रकरणी ईडीने जॅकलिनला तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत  (EOW)  महाठग सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सुमारे 200 कोटी रुपयांच्या खंडणीशी संबंधित आहे.

यापूर्वी रविवारी जॅकलिनला दुबईला जाण्यापासून थांबवण्यात आलं होतं. जॅकलीन तिच्या एका शोसाठी परदेशात जाणार होती. मात्र ईडीच्या लुक आऊट सर्क्युलरमुळे जॅकलीनला विमानतळावर थांबवण्यात आलं. वास्तविक ती परदेशात पळून जाण्याची भीती तपास यंत्रणेला होती. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर जॅकलिनला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

या प्रकरणी समन्स बजावत जॅकलिनला ८ डिसेंबरला म्हणजेच आज तपासात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. तपास पथक दिल्लीत त्यांचा जबाब नोंदवणार आहे. ईडीने शनिवारी सुकेश आणि इतर सात जणांविरुद्ध 7000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये जॅकलीन आणि नोरा फतेही यांना कोट्यवधींच्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा जबाब 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA)' अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात जॅकलीन साक्षीदार आहे. ठग सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला होता का? याचा तपास एजन्सी करत आहे.या प्रकरणी न्यायालयात पुढील सुनावणीची तारीख 13 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीचे अधिकारी मौन बाळगून आहेत. चौकशीनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हे वाचा:सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं?)

दिल्लीच्या रोहिणी तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका वर्षभरात एका व्यावसायिकाकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे २० हून अधिक गुन्हे दाखल असून कारागृहातूनच त्याने खंडणीचे एक रॅकेट चालवले आहे.

First published:

Tags: ED, Jacqueline fernandez