मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Money Laundering Case : जॅकलिन फर्नांडिस होती परदेशात जाण्याच्या तयारीत, मुंबई विमानताळवरून घेण्यात आलं ताब्यात

Money Laundering Case : जॅकलिन फर्नांडिस होती परदेशात जाण्याच्या तयारीत, मुंबई विमानताळवरून घेण्यात आलं ताब्यात

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता जॅकलिन फर्नांडिस परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता जॅकलिन फर्नांडिस परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता जॅकलिन फर्नांडिस परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे.

  मुंबई, 5 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  आता  जॅकलिन फर्नांडिस परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. जॅकलीन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालय- ED च्या लुक आउट सर्कुलर (LOC) मुळे मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखल्याचे समोर आले आहे. ही माहिती ईडीला देण्यात आली होती, त्यानंतर ईडीच्या पथकाने जॅकलिनची चौकशी केली, त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहे. याप्रकरणी ईडीच्या पथकाने तिची चौकशीही केली आहे. नुकताच जॅकलीनने ईडीसमोर तिचा जबाब देखील नोंदवला आहे.हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 23 ऑगस्ट रोजी आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या चेन्नई बंगल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. ईडीने छापा टाकलेल्या बंगल्याची किंमत करोडो रुपयांमध्ये सांगितली जात आहे.छाप्यादरम्यान कारवाई करत ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. यासह, 15 वाहने देखील जप्त करण्यात आली ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. अशा परिस्थितीत ईडी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी करत आहे. आता जॅकलिनला परदेशात जाण्यापासून ईडीने रोखले आहे. वाचा : जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेतून भारतात कशी पोहोचली? अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री! दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यापाऱ्याकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि तो कारागृहाच्या आतून रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. जॅकलिन मुळची श्रीलंकेची जॅकलिन मुळची श्रीलंकेची आहे. मात्र बॉलिवूडने तिला ओळख दिली तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानची ती जवळची मैत्रीण आहे. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. तिचे वडील संगीतकार तर आई एअर होस्टेस होती. चार भांवडात जॅकलीन सर्वात लहान आहे. जॅकलीन एक मोठी बहीण आणि दोन भाऊ आहेत. वाचा : 'थोडी तर लाज बाळग'; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral कोण आहे सुकेश चंद्रशेखर- मूळचा बेंगळुरू, कर्नाटकातील असलेल्या सुकेश चंद्रशेखरला हाय प्रोफाइल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सर्व प्रकार केले होते. बेंगळुरू पोलिसांनी जेव्हा सुकेशला पहिल्यांदा अटक केली, तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून त्याने 1.14 कोटींची फसवणूक केली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Jacqueline fernandez

  पुढील बातम्या