मुंबई, 8 जानेवारी- बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे
(Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरसोबतचे
(Sukesh Chandrashekhar) फोटो सोशल मीडियावर आज सकाळपासून
(Jacqueline Fernandez Sukesh Chandra Shekhar Photos) व्हायरल होत आहेत. नुकताच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सुकेश जॅकलिनला किस करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी जॅकलिनला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अभिनेत्री नाराज झाली असून तिने चाहत्यांना खास आवाहन केले आहे. ती म्हणते आहे की, मी सध्या खूप वाईट परस्थितीचा सामना करत आहे. माझी देखील काही प्रायव्हसी आहे, त्यामुळे माझे असले फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, असं आवाहन तिनं चाहत्यांना केलं आहे.
जॅकलीन फर्नांडीजने
(Jacqueline Fernandez Instagram) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनात लिहिले आहे की, या देशाने आणि या देशातील लोकांनी मला नेहमीच खूप आणि अमर्याद असं प्रेम दिले आहे. यामध्ये मीडियातील माझ्या मित्रांचा समावेश आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे. सध्या मी खूप वाईट काळातून जात आहे. मला आशा आहे की तुम्ही मला लवकरच यातून बाहेर पडताना पाहाल. माझ्या मीडियातील मित्रांना माझी विनंती आहे की, माझ्या प्रायव्हसीची काळजी घ्यावी.
वाचा-
सलमान खानला पुन्हा साप चावावा अशी आहे या अभिनेत्रीची इच्छा!
जॅकलीन फर्नांडिसने
(Jacqueline Fernandez Statement) तिच्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिले आहे की, माझे वैयक्तिक फोटो असे सोशल मीडियावर व्हायरल किंवा प्रसिद्ध करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीसोबत असं करू शकत नाही. मला आशा आहे की, तुम्ही माझ्यासोबत असं वागणार नाही. मला आशा आहे की. न्यायाच विजय होईल आणि याला तुम्ही ते चांगल्या दृष्टिकोनातून पाहाल..धन्यवाद.
सुकेशने जॅकलिनला दिल्यात महागड्या गिफ्ट
200 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात
(money laundering) अंमलबजावणी संचालनालयाला
(ED) ठग सुकेश चंद्रशेखरच्या चंद्रशेखर
(Sukesh Chandrashekhar) चौकशीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे
(Jacqueline Fernandez) नाव समोर आले. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत.
वाचा-
सलमान भडकला ; म्हणाला, 'घरात घुसुन मारेन अन् केसांना धरून बाहेर....'
जॅकलीन फर्नांडिस विरुद्ध एलओसी जारी
अंमलबजावणी संचालनालयाने 5 डिसेंबर रोजी जॅकलीन फर्नांडिस विरुद्ध एलओसी जारी केली होती. लुक आऊट नोटीसमुळे अभिनेत्रीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर थांबवले, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मस्कतला जात असताना तिला चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.