मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Money Laundering Case: जॅकलिन फर्नाडिसला मोठा दिलासा! 200 करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

Money Laundering Case: जॅकलिन फर्नाडिसला मोठा दिलासा! 200 करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

जॅकलिन फर्नाडिस

जॅकलिन फर्नाडिस

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर झाल्यानं तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  26 सप्टेंबर: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मागच्या काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चांगलीच अडकली आली होती. 200 कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून जॅकलिनची सातत्यानं चौकशी केली जात होती. पण आता मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा देत तिचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी जॅकलिन या प्रकरणी पटियाला कोर्टात सुनावणीसाठी हजर झाली होती. पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ईडीच्या चौकशीनंतर जॅकलिनचा सुकेशच्या केसमध्ये संबंध असल्याचं समोर आल्यानंतर अभिनेत्री पटियाला कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं. जॅकलिननं पटिया हाऊस कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीनंतर कोर्टानं अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा - Jacqueline Fernandez साठी सुकेशनं श्रीलंका-बहरिनमध्ये घेतलं होतं आलिशान घर, समोर आली महत्त्वाची माहिती

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती.  दरम्यान सुकेश चंद्रशेकरबरोबर आर्थिक व्यवहार केलेली आरोपी पिंकी इराणी देखील कोर्टात सुनावणीसाठी हजर होती.  पिंकीला अजून या प्रकरणी जमीन मंजूर झालेला नाही.

मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. ज्यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News