• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Manike mage hithe'वर जॅकलिननं योहानीसोबत केला जबरदस्त डान्स; काही तासांत 50 लाख लोकांनी पाहिला VIDEO

'Manike mage hithe'वर जॅकलिननं योहानीसोबत केला जबरदस्त डान्स; काही तासांत 50 लाख लोकांनी पाहिला VIDEO

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती श्रीलंकन सेन्सेशन योहानीसोबत (Yohani) डान्स करताना दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 4 नोव्हेंबर- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने  (Jacqueline Fernandez)  सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये ती श्रीलंकन सेन्सेशन योहानीसोबत  (Yohani)  डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलीन योहानीच्या 'मनिके मागे हिते' या लोकप्रिय गाण्यावर डान्स  (Dance Video)  करत आहे. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलसाठी बनवला आहे. सिंगर योहानीही जॅकलिनसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.  तुम्हाला माहित असेल की जॅकलीन देखील श्रीलंकेची आहे. अशा स्थितीत दोघांचं  खास बॉन्डिंग व्हिडिओमध्ये  दिसून येत आहे.
  व्हिडिओमध्ये जॅकलिन आणि योहानी व्हायरल झालेल्या गाण्यावर फ्री स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. यासोबतच या दोघांनीही 'पानी पानी' गाण्याच्या हुक स्टेपचा डान्समध्ये वापर केला आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन फर्नांडिसने व्हाइट एथनिक ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. गायिका योहानी देखील काळ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये कमालीची दिसत आहे. चाहत्यांना हा  इंस्टाग्राम रील खूप आवडत आहे. पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या 14 तासांत 50 लाखांहून अधिक लोकांनी हा रील पाहिला आहे. काय आहे जॅकलिनची पोस्ट- इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत जॅकलीनने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जेव्हा तुम्ही श्रीलंकेत असता तेव्हा, जर तुम्ही तिला भेटू शकत असाल तर #manikemagehite वर योहानीसोबत डान्स करा. हे गाणं खूपच क्यूट आहे." (हे वाचा:एकता कपूरच्या पार्टीत घाबरलेली दिसली हिना खान; VIDEO मध्ये दिसलं सत्य) जॅकलिनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं  झालं  तर ती सध्या 'राम सेतू' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आहे. 'राम सेतू'मध्ये नुसरत भरुचाचीही महत्त्वाची भूमिका आहे. या व्हायरल गाण्याच्या हिंदी व्हर्जनसह गायक योहानी लवकरच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या 'थँक गॉड' या चित्रपटात योहानीचे एक गाणे असणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांसारखे मोठे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, इंद्र कुमार आणि अशोक ठकेरिया यांनी  केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. थँक गॉड या चित्रपटातील योहानीच्या हिट ट्रॅकच्या हिंदी आवृत्तीचे बोल गीतकार रश्मी विराग यांनी लिहिले आहेत.  तर संगीतकार तनिष्क बागची हे गाणं तयार करणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: