मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अखेर जॅकलीनचं स्वप्न होणार पूर्ण; रणवीर सिंहसोबत 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

अखेर जॅकलीनचं स्वप्न होणार पूर्ण; रणवीर सिंहसोबत 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

या दोघांसोबत काम करण्याचं तिचं स्वप्न (Dream) होतं, असा खुलासा तिने नुकताच केला आहे.

या दोघांसोबत काम करण्याचं तिचं स्वप्न (Dream) होतं, असा खुलासा तिने नुकताच केला आहे.

या दोघांसोबत काम करण्याचं तिचं स्वप्न (Dream) होतं, असा खुलासा तिने नुकताच केला आहे.

मुंबई, 05 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज (Jacqueline fernadez) यावर्षी आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. जॅकलीन अलीकडेच सैफ अली खानच्या (Saif ali khan) 'भूत पोलीस' (Bhoot Police) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. आता या चित्रपटाच्या शुटींगनंतर जॅकलीन लवकरच रोहित शेट्टी (Director Rohit Shetty) दिग्दर्शित 'सर्कस' (Circus) या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडीज अभिनेता रणवीर सिंह (Ranveer singh) सोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जॅकलीन पहिल्यांदाच रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी या जोडगोळीसोबत काम करणार आहे. 'रणवीर आणि रोहित शेट्टीसोबत काम करण्याचं माझं एक स्वप्न होतं,' असा खुलासा जॅकलीनने नुकताच केला आहे.

जॅकलीन यावेळी म्हणाली की, 'या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. कारण रोहित शेट्टी आणि रणवीर कपूर यांच्यासोबत काम करणं, हे माझं स्वप्न होतं.' जॅकलीन आणि रणवीर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्रित दिसणार आहेत. जॅकलीनने पुढे म्हटलं की, ती आता या दोघांसोबत चांगली मिसळली आहे. कारण दोघंही नेहमीची 'ऊर्जावान' आणि 'सकारात्मक' असतात.

पद्मावत फेम अभिनेता रणवीर सिंह आपल्या एनर्जीसाठी ओळखला जातो, तर जॅकलीन तिच्या स्पार्कलिंग पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. त्यामुळे 'सर्कस' या आगामी चित्रपटात दोघांची जुगलबंदी दर्शकांना पाहायला मिळणार आहे. दोघांच्या अशा उत्साही स्वभावामुळे दोघांवर नियंत्रण ठेवणं दिग्दर्शक रोहित शेट्टीला अवघड गेलं आहे. पण कामाच्या वेळी मात्र आम्ही दोघांनीही खूप गंभीरपणे काम केलं आहे, असंही ती पुढे म्हणाली.

जॅकलीनच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत बोलायचं झालं तर, जॅकलीन 2021 मध्ये 4 मोठ्या चित्रपटावर काम करत आहे. त्यामुळे चालू वर्ष तिच्यासाठी खूपच व्यग्र ठरणार आहे. ती बच्चन पांडे, किक-2, भूत पोलीस आणि सर्कस या बड्या प्रोडक्शनसोबत काम करत आहे. त्यामुळे जॅकलीनच्या चाहत्यांसाठी 2021 हे वर्ष चित्रपटांची मेजवानी देणारं ठरणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Ranveer sigh, Rohit Shetty