Home /News /entertainment /

'लाज वाटत नाही का?'; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कृष्णा श्रॉफचं सडेतोड उत्तर

'लाज वाटत नाही का?'; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कृष्णा श्रॉफचं सडेतोड उत्तर

अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहीण कृष्णा (krishna Shroff) ही चित्रपटसृष्टीपासून कोसो दूर आहे. पण ट्रोलर्सने तिला कायमच आपला निशाणा बनवतात.

  मुंबई, 14 एप्रिल : अभिनेता जॅकी श्रॉफची (Jacky Shroff) मुलगी कृष्णा श्रॉफला (Krishna Shroff) वेळोवेळी ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे. आता ती जॅकी यांच्यासोबतच्या एका व्हिडीओमुळे  आणि फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यात तिने एका पूल मध्ये बिकिनी (Krishna shroff bikini photos) परिधान केली होती. कृष्णाचा असा बिकिनी लूक पाहून एका युझरने त्यावर संतापजनक कमेंट (user trolls krishna shroff) केली.  "मॅडम तुमचा भाऊ टायगर किती चांगला आहे पण तुम्ही बेकार बेकार, तुम्हाला लाज वाटत नाही का?. घरी तुमचे आई बाबा हे फोटो पाहत नाहीत का?", अशी कमेंट युझरने केली.
  अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff sister) बहीण  कृष्णा ही चित्रपटसृष्टीपासून कोसो दूर आहे. पण ट्रोलर्सने तिला कायमच आपला निशाणा बनवलं आहे. हे वाचा - OMG! करिश्माची कार्बन कॉपी; फोटो पाहून ओळखणार नाही कोण खरं, कोण डुप्लिकेट कृष्णानेसुद्धा या युझरला सणसणीत उत्तर दिलं आहे. "माझी काळजी करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. भाड में जाओ. कोणी माझा मेसेज यांच्यासाठी ट्रान्सलेट करेल का?" अशा शब्दात त्या ट्रोलरला उत्तर दिलं.
  कृष्णा ही चित्रपटात नाही तर फिटनेस क्षेत्रात (fitness field)  अॅक्टिव्ह आहे. ती एक फिटनेस ट्रेनरदेखील आहे. तिचे अनेक व्यायामांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. टायगरप्रमाणेच तीसुद्धा अतिशय फिट असून तिनेही मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Tiger Shroff

  पुढील बातम्या