मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OK Computer मध्ये जॅकी श्रॉफ का झाले नग्न; व्हायरल फोटोवर म्हणाले...

OK Computer मध्ये जॅकी श्रॉफ का झाले नग्न; व्हायरल फोटोवर म्हणाले...

गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून काहीसे दूर असलेले जॅकी आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ओके कॉम्प्युटर (OK Computer ) असं या आगामी सीरिजचं नाव आहे.

गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून काहीसे दूर असलेले जॅकी आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ओके कॉम्प्युटर (OK Computer ) असं या आगामी सीरिजचं नाव आहे.

गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून काहीसे दूर असलेले जॅकी आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ओके कॉम्प्युटर (OK Computer ) असं या आगामी सीरिजचं नाव आहे.

  मुंबई 13 मार्च: जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच पठडीबाहेरील भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. करिअरच्या उत्तरार्धातही त्यांच्या अभिनयातील तो गुण प्रेक्षकांना विशेष आकर्षित करतो. गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून काहीसे दूर असलेले जॅकी आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ओके कॉम्प्युटर (OK Computer ) असं या आगामी सीरिजचं नाव आहे. नुकताच या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अन् या ट्रेलरमधील जॅकी श्रॉफ यांच्या न्यूड सीननं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

  या सीरिजमध्ये जॅकी पुष्पक ही भूमिका साकारत आहेत. या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, “मी साकारत असलेले पुष्पक हे पात्र तंत्रज्ञानाची गरज जाणते. परंतु या तंत्रज्ञानामुळे त्याला पर्यावरणास हानी किंवा त्यात बाधा पोहोचू नये असं वाटतं. पुढच्या पिढीने तंत्रज्ञानबरोबरच पर्यावरणाकडे (Environment) देखील अधिक प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे असं या व्यक्तिरेखेला वाटतं. या भुमिकेबाबत मला समजल्यानंतर माझी उत्सुकता अधिकच वाढली. ही भुमिका साकारताना पडलेली पानं आणि फुलांपासून तयार केलेले कपडे मी परिधान करावेत असं मला वाटत होतं. पण आमच्या क्रिएटिव्ह टिमनं मला न्यूड होण्यासंबंधी सुचवलं आणि या भागाचा भूमिकेत समावेश केला. ही सिरीज पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल, कारण ही भूमिका साकारताना मला स्वतःला खूप आनंद आणि समाधान मिळालं आहे.”

  अवश्य पाहा - चर्चा तर होणारच...; सायली संजीवची BOLD दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

  " isDesktop="true" id="530270" >

  या सिरीजमधील पुष्पक (Pushpak) हे पात्र अपारंपरिक असल्याचं दिसतं. तो ग्रे शेड असलेला तंत्रज्ञान आणि विज्ञानविरोधी आहे. विजय वर्मा साजन कुंडूच्या हत्येचा तपास करत असून पुष्पक हा या हत्याकांडातील मुख्य संशयितांपैकी एक आहे. स्वयंचलित ड्रायव्हिंग कारच्या मदतीनं ही हत्या करण्यात आली आहे असं काहीसं या मालिकेचं कथानक आहे.

  ओके कॉम्प्युटर ही देशातील पहिलीच साय-फाय कॉमेडी (Sci-Fi Comedy) वेब सीरिज आहे. या ट्रेलरवरुन सिरीजचं कथानक हे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि मानव निर्मित तंत्रज्ञान मानवजातीवर मात करेल की नाही यावर आधारित आहे. ओके कॉम्प्युटर या सिरीजची निर्मिती आणि सहलेखन आनंद गांधी यांनी केलं आहे. यात राधिका आपटे, जॅकी श्रॉफ, रसिका दुग्गल आदींच्या भूमिका आहेत. 26 मार्चपासून ही सिरीज डिस्ने+हॉटस्टारवर पाहता येईल.

  First published:
  top videos

   Tags: Entertainment, Marathi entertainment