'ठग्ज आॅफ हिंदुस्तान'मध्ये जॅकी श्राॅफची एन्ट्री

'ठग्ज आॅफ हिंदुस्तान'मध्ये जॅकी श्राॅफची एन्ट्री

सिनेमात जॅकीची महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय.

  • Share this:

30 मे : यशराज फिल्म्सच्या 'ठग्ज आॅफ हिंदुस्तान'मध्ये आता एंट्री होणारेय जॅकी श्राॅफची. सिनेमात जॅकीची महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. ट्रेड गाईड तरण आदर्श यांनी ते ट्विटही केलंय.

आमिर खान, अमिताभ बच्चन आणि जॅकी श्राॅफ हे तिघं पहिल्यांदाच सिनेमात एकत्र येतायत. अमिताभ अामिरच्या वडिलांची भूमिका करतायत. विजय आचार्य सिनेमाचं दिग्दर्शन करतायत.

आमिरनं नेटफ्लिक्ससोबत 120 कोटींचा करार केलाय. त्यामुळे नेटफ्लिक्सला सॅटेलाईट्स आणि डिजिटल राइट्स मिळालेत. अर्थात, अजून त्याची अधिकृत घोषणा व्हायचीय.

सिनेमात कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत. जॅकी आणि आमिर 'धूम 3'मध्ये एकत्र होते. जॅकीनं आमिरसोबत 'रंगीला'मध्ये काम केलं होतं. या तिघांना एकत्र पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading