Home /News /entertainment /

13 वर्षींय मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते जॅकी श्रॉफ, गर्लफ्रेंडलाही दिलं सोडून आणि...

13 वर्षींय मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते जॅकी श्रॉफ, गर्लफ्रेंडलाही दिलं सोडून आणि...

जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यातला तो काळ खास चर्चेत राहिला जेव्हा त्यांना 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर प्रेम जडलं होतं.

  मुंबई, 26 एप्रिल : जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव. एक काळ असा होता जेव्हा जॅकी श्रॉफच्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचं पर्सनल लाइफ सुद्धा बरंच चर्चेत राहिलं होतं. पण त्यांच्या आयुष्यातला तो काळ खास होता जेव्हा त्यांना 13 वर्षांच्या मुलीवर प्रेम जडलं होतं. जॅकी श्रॉफ त्यावेळी एका रेकॉर्डिंगसाठी जात होते. बस स्टॉपवर उभे असताना त्यांची ओळख बसमध्ये बसलेल्या एका मुलीवर पडली. बसमध्ये एक 13 वर्षांची सुंदर मुलगी बसली होती. तिला पाहिल्यावर जॅकी यांना पहिल्या नजरेतच तिच्यावर प्रेम जडलं. त्यांनी पटकन ती बस पकडली आणि त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्या मुलीचं नाव होतं आयशा. जॅक श्रॉफ यांनी पहिल्याच नजरेत आयशावर प्रेम जडलं आणि मग भेटी वाढत गेल्या. प्रेमाची जाणीव पुढे आयशालाही होत गेली. काही ऐकण्या, सांगण्याच्या आधी यांच्या लव्ह स्टोरीमध्ये अशीच संकट आली जी प्रत्येक लव्हस्टोरीमध्ये येत असतात आणि आपल्याला प्रत्येक सिनेमात पाहायला मिळतात.
  View this post on Instagram

  40 years ago I was hangin on to him and 40 years later still hangin on to him!!😀😀😀😀😀❤❤ @apnabhidu

  A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff) on

  आयशा एका श्रीमंत कुटुंबातली मुलगी होती. पण त्यापेक्षाही मोठी समस्या ही होती की जॅकी तिच्या अगोदरही एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी त्यांची गर्लफ्रेंड अमेरिकेत होती आणि ती परत आल्यानंतर जॅकी तिच्यासोबत लग्न करणार होते. पण आयशाच्या प्रेमात पडलेल्या जॅकी यांनी आता आपल्या गर्लफ्रेंडला कसं सांगावं हा प्रश्न पडला होता. पण त्यांच्या प्रेमापुढे कोणतीच समस्या टिकली नाही. आयशानं जॅकी यांच्या गर्लफ्रेंडला सर्वकाही सांगण्याचा निर्णय घेतला आणि तिनं एका पत्रात हे लिहून जॅकी यांच्या गर्लफ्रेंडला पाठवून दिलं.
  View this post on Instagram

  ❤️ @apnabhidu

  A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff) on

  एका श्रीमंत घराण्यातून आलेली आयशा लग्नानंतर काही काळ जॅकी यांच्यासोबत चाळीत सुद्धा राहिली. आयाशा जॅकी यांच्या लाइफमध्ये आल्यावर ते पूर्णपणे बदलले. आज जॅकी आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपली पत्नी आयशाला देतात.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या