मुंबई, 5 जुलै : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याचा गामी सिनेमा ‘जबरिया जोडी’मुळे खूप चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यावर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मात्र त्याआधी सिद्धार्थ त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सतत चर्चेत होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी याच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू होत्या. त्यानंतर त्याचं नाव ‘स्टूडंट ऑफ द इअर 2’ची अभिनेत्री तारा सुतारिया सोबतही जोडलं गेलं. तारा आणि सिद्धार्थ लवकरच विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थनं त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत खुलासा केला आहे.
‘Tarak Mehta Ka Oolta Chashma’ला मिळाली नवी दयाबेन? अभिनेत्रीनं केला खुलासा
मुंबई मिररला नुकत्याच दिलेल्या मुलाखातीत सिद्धार्थला तारा आणि कियारासोबतच्या अफेअर्सच्या चर्चांवर काही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, ‘या जबरिया म्हणजेच जबरदस्तीच्या अफवा आहेत, जबरिया लिंकअप आहे आणि कोणतीही गोष्ट जबरदस्तीनं केली तर ती चांगली नसते.’ सिद्धार्थनं त्या प्रश्नाचं उत्तर खुपच हटके दिलं आणि यासोबतच त्यानं सिनेमालाही प्रमोट केलं.
मलायका-अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट, नीतू कपूर म्हणतात...
View this post on Instagram
सिद्धार्थनं याआधी आलिया भटला डेट केलं आहे. त्यांच्या नात्याची सगळीकडे खूप चर्चाही होती. मात्र काही काळानंतर त्यांच्यातील मतभेद वाढल्यानं दोघंही वेगळे झाले. या दोघांनीही करण जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इअर’ मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या आलिया रणबीर कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघांच्याही घरच्यांकडून त्यांच्या नात्याला होकार आहे. त्यामुळे लवकरच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकण्याची चर्चा आहे. आलिया आणि रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अभिनेता विद्युत जामवालनं असं पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा व्हिडिओ
सिद्धार्थच्या आगामी सिनेमांबाबत बोलायचं तर त्याचा ‘जबरिया जोडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. यातील सिद्धार्थच्या बिहारी लुक आणि स्टाइलचं खूप कौतुक होत आहे. या सिनेमात अभिनेत्री परिणीती चोप्रा सिद्धार्थसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.