जब हॅरी मेट सेजल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप

जब हॅरी मेट सेजल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप

रिलीज झाल्यानंतर चार दिवसांनीसुद्धा या सिनेमाला 100 कोटीचा तर सोडा पण 60 कोटीचाही आकडा पार करता आलेला नाही.

  • Share this:

09 ऑगस्ट : बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरूख खानचा 'जब हॅरी मेट सेजल'ला प्रेक्षकांनी काही विशेष पसंती दिल्याचं दिसत नाही. रिलीज झाल्यानंतर चार दिवसांनीसुद्धा या सिनेमाला 100 कोटीचा तर सोडा पण 60 कोटीचाही आकडा पार करता आलेला नाही.

हा सिनेमा शुक्रवारी 4 ऑगस्टला रिलीज झाला होता. ट्रेड गाईड तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाने पहिल्या दिवशी 15.25 कोटी, शनिवारी 15 कोटी, रविवारी 15.50 कोटी, तर रक्षाबंधनच्या दिवशी फक्त 7.15 कोटी इतकीच कमाई केली. तर एकूण 52.90 कोटीची कमाई या सिनेमाने केली आहे. या काळात बॉलिवूडला एका हिट सिनेमाची नितांत गरज होती असंही तरण आदर्श म्हणाले. याआधीही ट्युबलाईट, जग्गा जासूससारखे सिनेमे प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले नाहीत. याचं विश्लेषण करताना आदर्श म्हणाले की फक्त मोठा स्टार असून चालत नाही सिनेमाची कथा, संगीत सारंच मजबूत असावं लागतं.

आता यानंतर सगळ्यांचं लक्ष अक्षय कुमारच्या येत्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाकडे लागलंय.

First published: August 9, 2017, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading