• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवशी 16 कोटीची कमाई

'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवशी 16 कोटीची कमाई

मात्र, फस्ट डेची कमाई शाहरूखच्या इतर सिनेमांच्या तुलनेत मात्र कमीच राहिली आहे.

  • Share this:
05 आॅगस्ट : 'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवसाची बॉक्सऑफीस कमाई 16 कोटी झालीय. मात्र, फस्ट डेची कमाई शाहरूखच्या इतर सिनेमांच्या तुलनेत मात्र कमीच राहिली आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा या जोडीचा 'जब हॅरी मेट सेजल' शुक्रवारी प्रदर्शित झाला. इम्तियाज अलीचं दिग्दर्शन आणि प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झालेली गाणी यामुळे हा सिनेमा बॉक्सऑफीसवर काय कमाई करतो याकडे अनेकांचं लक्ष होतं. शाहरुख खानच्या चाहत्यांचा मोठा वर्ग असल्याने या कमाईचा आकडा मोठा असेल अशीच शक्यता वर्तवली जात होती.पण त्यामानाने तुलनेने कमी आकडा पहायला मिळाला. जब हॅरी मेट सेजलची पहिल्या दिवसाची बॉक्सऑफीस कमाई 16 कोटी झालीय. शाहरुख खानच्या हॅपी न्यू इयर आणि चेन्नई एक्स्प्रेस यांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे 40 आणि 30 कोटींच्या वर आकडा पार केला होता. आता वीकेण्ड आणि जोडून आलेली रक्षाबंधनाची सुट्टी या सिनेमाच्या पथ्य़ावर पडते का हे पाहायचं.
First published: