जे. ओमप्रकाश यांच्या सिनेमांमध्ये A अक्षराचं होतं 'हे' रहस्य

ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान जे. ओमप्रकाश यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 01:53 PM IST

जे. ओमप्रकाश यांच्या सिनेमांमध्ये A अक्षराचं होतं 'हे' रहस्य

मुंबई, 7 ऑगस्ट : प्रसिद्ध दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचं नुकतंच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी 'आखिर क्यूं', 'आप की कसम', 'आई मिलन की बेला', 'आया सावन झूम के', 'आए दिन बहार के', 'आदमी खिलौना है' सारख्या सुपरहीट सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. ओमप्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा म्हणजेच हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. हृतिकचं त्याच्या आजोबांशी खास बॉन्डिंग होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, 2016मध्ये त्यानं ओमप्रकाश यांना एक लक्झरी कार गिफ्ट दिली होती. काही दिवसांपूर्वीच सिनेमा 'सुपर 30'च्या प्रमोशन दरम्यान हृतिक त्याच्या आजोबांबद्दल बोलला होता. आजोबा ओमप्रकाश हेच आपले सुपर टिचर असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

आश्चर्यच म्हणायचं ! डाएट न करता खिलाडी अक्षय कुमारनं असं कमी केलं 6 किलो वजन

ओमप्रकाश यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे आहेत. त्यांच्या या सर्व सिनेमांचं विशेष हे होतं की त्यांच्या प्रत्येक सिनेमाच्या नावाची सुरुवात ही इंग्रजी A अक्षरापासून होत असे. ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान त्यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले, माझा एक असा समज आहे ज्यामुळे माझ्या सर्व सिनेमांची नावं A वरुन सुरू होतात. मी आतापर्यंत जेवढे A अक्षरावरून सुरू होणारे सिनेमा तयार केले ते सर्व सुपरहिट झाले. एकदा मी वेगळ्या अक्षरावरून सिनेमा तयार केला जो फ्लॉफ ठरला. त्यानंतर मला A अक्षरावरील विश्वास जास्तच वाढला.

7वर्ष पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहिलेल्या भारताच्या 'रॉबिनहुड'वर येणार सिनेमा

दिग्दर्शक म्हणून जे. ओमप्रकाश यांचा पहिला सिनेमा ‘आपकी कसम’ हा होता. ज्यामध्ये राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाती गाणी 'जय जय शिव शंकर' आणि 'करवटें बदलते रहे' आजही तेवढीच लोकप्रिय आहेत जेवढी त्यावेळी होती. याशिवाय जे. ओमप्रकाश शंकराचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर त्यांनी शिव मंदिर बांधलं होतं. ज्याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला पुजेचं आयोजन केलं जातं. ओमप्रकाश यांनी 'आपकी कसम', 'आदमी खिलौना है', 'अर्पण', 'आक्रमण', 'आदमी और अप्सरा', 'अग्नि', 'आप के साथ', 'आखिर क्यों?', 'अपना बना लो', 'आस पास', 'अपनापन', 'आशिक हूँ बहारों का', 'आक्रमण' आणि ‘भगवान दादा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

Loading...

याशिवाय त्यांनी 'आई मिलन की बेला', 'आस का पंछी', 'आए दिन बहार के', 'आंखों आंखों में', 'आया सावन झूम के' आणि 'आखिर क्यों' या सिनेमांची निर्मितीही केली. त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत, 'आप की कसम' आणि 'आखिर क्यों' हे सुपरहिट सिनेमा दिले. तर अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत 'अपना बनलो', 'अपनापन', 'आशा' आणि 'अर्पण' यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

EXCLUSIVE देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं नाही- अमृता फडणवीस

===================================================================

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...