Home /News /entertainment /

'इस बार का प्यार थोडा दूर से यार'; वाढदिवसाआधी शाहरुखचं चाहत्यांना आवाहन

'इस बार का प्यार थोडा दूर से यार'; वाढदिवसाआधी शाहरुखचं चाहत्यांना आवाहन

दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते 'मन्नत' बाहेर येऊन त्याला शुभेच्छा देतात. या वर्षी अशी गर्दी करणं धोक्याचं आहे हीच बाब लक्षात घेता शाहरुखने आधीच ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे.

  मुंबई, 29 ऑक्टोबर : बॉलिवूड किंग खान शाहरुखने त्याच्या वाढदिवसाआधी आपल्या चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. शाहरूख खानने ट्विटरवर मंगळवारी #AskSRK या हॅशटॅगअंतर्गत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुख खानचा बर्थडेजवळ येत असतानाच त्याच्या एका चाहत्याने त्याला आपल्या वाढदिवसाच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तुमच्या वाढदिवसानिमित्त काय प्लॅन आहेत? असं विचारत त्यांने शाहरुखला सांगितलं की, पोलिस तुमच्या बंगल्याबाहेर आम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, कृपया मी सर्वांना विनंती करतो की, कोणीही बंगल्याबाहेर गर्दी करू नका. 'इस बार का प्यार थोडा दूर से यार' असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना covid-19 मुळे कोणीही त्याच्या वाढदिवसाला, मुंबईतील त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर बाहेर गर्दी करू नये, असं सांगितलं आहे. शाहरुखने चाहत्यांना, वाढदिवसाच्या काही दिवस आधीच कोविडमुळे गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. (वाचा - IPL 2020 : KKR च्या खराब कामगिरीवर चाहत्याचा प्रश्न, शाहरुखने दिलं मनातलं उत्तर) इतक्या वर्षाच्या आपल्या कारकीर्दीत शाहरुख खाने चाहत्यांचं खूप प्रेम मिळवलं आहे. म्हणूनच दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते 'मन्नत' बाहेर येऊन त्याला शुभेच्छा देतात. या वर्षी अशी गर्दी करणं धोक्याचं आहे हीच बाब लक्षात घेता शाहरुखने आधीच ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) शाहरुख खान आपल्या क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्ससोबत (Kolkata Knight Riders)दुबईत आहे. त्यामुळे कदाचित शाहरुख 55वा वाढदिवस यूएईमध्ये साजरा करण्याची शक्यता आहे.

  (वाचा - DDLJच्या 'या' गाण्याचं अफलातून रिक्रिएशन; खुद्द शाहरुख खाननेच शेअर केला VIDEO)

  #AskSRK या हॅशटॅगने शाहरुखचे चाहते त्याला अनेक प्रश्न विचारत असतात. त्या प्रश्नांना शाहरुख उत्तरही देत असतो. यावेळी एकाने शाहरुखला तुमचा कोणत्या गोष्टीवर सर्वांत जास्त विश्वास आहे? असा प्रश्न विचारला, यावर शाहरुखने 'लोकांचे मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नका त्यांना समजून घ्या, आपण कुठे कमी पडतोय हे समजून घेणं हीच आपली सर्वांत मोठी ताकद असते.’असं तो म्हणाला. (वाचा - Modi Season 2 Trailer: मोदींवर आधारित वेब सीरिजमध्ये CM ते PM पदापर्यंतचा प्रवास)
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Shahrukh khan

  पुढील बातम्या