मुंबई, 29 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी रंगलेल्या वादावरून सध्या सोशल मीडियावर एक विषय सुरू आहे तो म्हणजे काश्मीर फाइल्स. इफ्फीचे ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सला व्हल्गर आणि प्रोपगंडा असल्याचं म्हणत टीका केला. या टीकेनंतर चांगलाच वाद रंगला. अनुपम खेर ते सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनीही नाराजी व्यक्त करत सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान हा सगळा प्रकार वाढत असताना अशातच इस्रायली राजदूतांनी पुढे येत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायली राजदूत नाओर गिलोन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच माफी देखील मागितली आहे.
इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन या झालेल्या प्रकाराची माफी मागितली आहे. लॅपिड यांनी मनोगतात व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकाराची मला माणूस म्हणून लाज वाटतेय असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट शेअर केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, भारत आणि इस्राइल या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून घनिष्ट मैत्री आहे. आमच्याकडून सहन कराव्या लागलेल्या गोष्टींनंतर ही मैत्री कायम राहिली. पण एक माणूस म्हणून या प्रकाराची लाज वाटते.
हेही वाचा - Kashmir Filesला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणाऱ्या नादेव वर भडकले अनुपम खेर
झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो.. सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है.. pic.twitter.com/OfOiFgkKtD
— Anupam Kher (@AnupamPKher) November 28, 2022
तसंच त्यांनी इफ्फीचे ज्यूरी हेड नादव लॅपिड यांना म्हटलंय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहूणे हे देवासमान असतात. इफ्पी महोत्सवात तुम्ही जज पॅनेलच्या अध्यक्ष म्हणून निमंत्रित केल्यानंतर तुम्ही त्यांच्या निमंत्रणाबरोबरच त्यांचा विश्वास, सन्मान, त्यांनी केलेल्या स्वागताचा दुरूपयोग केला आहे. मित्र राष्ट्र असलेल्या भारताने इस्राइलची प्रतिमा पाहण्यासाठी आपल्याला तिथे बोलावलं होतं.
इतकंच नाही तर काश्मीर फाइल्सला अश्लिल आणि व्हल्गर म्हणणं नादव लॅपिडला चांगलंच महागात पडलं आहे. नावद विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे प्रॅक्टिस वकील विनोद जिंदल यानी ही FIR केली आहे. FIRमध्ये म्हटलं गेलं आहे की, नावद यांच्या वक्तव्यामुळे दोन गटांमध्ये शत्रूत्व निर्णाण करण्याचा हेतू दिसून येत आहे. तसंच त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 121,153,153A और B, 295, 298 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News